देशातील लोकशाही टिकवण्यासाठी शिवशाही हाच एक बलदंड आधार !
छत्रपती शिवाजी महाराज यांनी इस्लामिक सत्तेला पायाखाली दाबून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. त्याचप्रमाणे डच, पोर्तुगीज, इंग्रज आणि फ्रेंच यांच्यावरही स्वतःचा वचक बसवला. म्हणूनच छत्रपती शिवराय या देशाचे राष्ट्रपुरुष आणि प्रेरणास्रोत आहेत. ‘शत्रू कितीही बलाढ्य असला आणि त्याच्याकडे कितीही संख्याबळ असले, तरी त्याला भीक न घालता स्वत्व टिकवून स्वराज्य निर्माण करता येते. शत्रूवर स्वतःचा वचक बसवता येतो’, हे छत्रपती शिवरायांनी स्वकृतीने दाखवून दिले आहे. ‘पराक्रमी पुरुषाने कोणत्याही परिस्थितीत न डगमगता शौर्याने क्रौर्य नष्ट केले पाहिजे’, हा वस्तूपाठ छत्रपती शिवरायांनी घालून दिला. अशी शौर्याची, पराक्रमाची, विजयाची परंपरा निर्माण करणारी शिवशाही हा आपल्या हिंदु राष्ट्राचा आणि लोकशाहीचा आधारस्तंभ आहे.
१. लोकशाहीवाद्यांनी शिवशाहीकडे पाठ फिरवणे, म्हणजे आत्मघात !
काँग्रेससारख्या पक्षाला शस्त्रबळाचे महत्त्व कधीही कळणार नाही. औरंगजेब, अफझलखान, टिपू सुलतान हे ज्यांचे प्रातःस्मरणीय महापुरुष असतील, त्यांना छत्रपती शिवराय पचणार नाहीत. शत्रू पुढे नांगी टाकून लाळघोटेपणा करण्यातच पुरुषार्थ मानणार्या या राष्ट्रघातकी प्रवृत्तीला स्वराष्ट्राभिमानाचे धगधगते तेज मानवणार नाही. लोकशाहीच्या नावाखाली स्वातंत्र्याचा मुलामा देऊन मुसलमानांच्या ताटाखालचे मांजर होण्यातच ज्यांना धन्यता वाटते, त्यांना शिवशाहीचे मोल कळणे कदापि शक्य नाही. याच काँग्रेसने अफझलखान वधाचे चित्र सार्वजनिक ठिकाणी लावण्यास बंदी केली होती. ही गोष्ट या देशातील जनता विसरली नाही. लोकशाही शिवशाहीचे अपत्य आहे. म्हणून लोकशाहीवाद्यांनी शिवशाहीकडे पाठ फिरवणे, म्हणजे आत्मघात करण्यासारखे आहे.
२. स्वराज्य म्हणजे काय ?
ज्यात स्वत्व आणि स्वाभिमान टिकून रहातो तेच स्वातंत्र्य, तेच सार्वभौमत्व होय ! हा विचार छत्रपती शिवरायांनी आपल्याला दिला. ‘हिंदवी स्वराज्य याचा अर्थ कोणत्याही परकीय आक्रमकाला या राष्ट्रात कोणतेही घातपाती कृत्य करता येणार नाही’, असा वचक निर्माण करणे होय. या देशाची संस्कृती, देशाचा धर्म, देशाची ऐतिहासिक परंपरा यांविषयी आत्मीयता प्रत्येकाच्या अंतःकरणात असलीच पाहिजे. ती जर नसेल, तर त्याला या देशामध्ये कोणतेही स्थान नाही; कारण तो या देशाचा शत्रूच ठरतो; पण ही विचारसरणी शस्त्र, स्वत्व, स्वाभिमान आणि राष्ट्रवाद यांविषयी ज्यांच्या मनात घृणा निर्माण झालेली आहे, अशा लोकांना हे क्षात्रतेज सहन होणार नाही.
३. राष्ट्रपुरुषांची परंपरा नष्ट करण्याचा आत्मघातकी प्रकार राष्ट्राला पारतंत्र्याच्या तिमिरात ढकलणारा !
आपल्या देशातील अनेक वीर पूर्वजांनी अनंत काळ संघर्ष करून आपला देश, आपली संस्कृती, हिंदु धर्म, आपली थोर परंपरा जतन करण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी जीवाचे रान केले, प्रसंगी प्राणार्पणही केले. त्याकडे दुर्लक्ष करून कृतघ्नतेने वागून राष्ट्रघातकी आणि राष्ट्रद्रोही प्रवृत्तीच्या पाठीशी उभे राहून त्यांना सर्व प्रकारचे सहकार्य करण्यासाठी अन् त्यांची सहानुभूती मिळवण्यासाठी आपल्याच राष्ट्रीय पुरुषांची परंपरा नष्ट करण्याचा हा आत्मघातकी प्रकार राष्ट्राला पारतंत्र्याच्या तिमिरात ढकलणारा आहे. ही साधी गोष्ट ही ज्यांच्या लक्षात येत नाही, त्यांचा पुरुषार्थ जिवंत आहे, असे म्हणण्यास बुद्धी सिद्ध होत नाही.
वीर पुरुषांची परंपरा लाथाडून राष्ट्राच्या मुळावर उठणार्या लोकांच्या चरणी बसून त्यांची चरण सेवा करणारे लोक हे विसरतात की, उद्या त्यांच्यासाठी अनुकूल काळ येताच तेच त्यांच्या कंबरड्यात लाथा घातल्यावाचून रहाणार नाहीत. राष्ट्राची संस्कृती आणि स्वातंत्र्य यांच्याशी एकनिष्ठ नसलेल्या लोकांशी सख्ख्य जोडणे, म्हणजे मगरीच्या तोंडात आश्रय घेण्यासारखे आहे.
४. कर्नाटकातील काँग्रेस सरकारने छत्रपती शिवरायांचा पुतळा हटवणे, हे राष्ट्राच्या स्वातंत्र्याला आणि सार्वभौमत्वाला आग लावणारे !
कर्नाटकातील काँग्रेस सरकारने छत्रपती शिवरायांचा पुतळा जेसीबीने हटवला. याआधी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा धडा पाठ्यपुस्तकातून काढला. वीर पुरुषांची परंपरा जतन करायची असते. त्यांचे शौर्य आणि त्याग यांचा धगधगता इतिहास पिढ्यानपिढ्या टिकून रहावा, जनतेच्या रक्तात भिनावा; म्हणून जगातील प्रत्येक राष्ट्र झटत असते. आपल्या देशातील काही लाळघोटेपणा करणार्या लोकांना स्वकियांपेक्षा परकीय आक्रमकांविषयी प्रेमाचा उमाळा येतो. त्यांचे हे प्रेम राष्ट्राच्या स्वातंत्र्याला आणि सार्वभौमत्वाला आग लावणारे आहे.
देशातील लोकशाही टिकवायची असेल, तर मुसलमानांच्या दाढ्या कुरवाळून टिकवता येणार नाही. त्यासाठी शिवशाहीचे बलवर्धक औषधच उपयुक्त ठरते. कुणी कितीही छत्रपती शिवरायांचे पुतळे हटवले किंवा देशातील शौर्यपरंपरा नष्ट करण्याचा प्रयत्न केला, तरी या देशातील जनता स्वस्थ बसणार नाही. या राष्ट्राचे स्वातंत्र्य अबाधित रहाण्यासाठी छत्रपती शिवरायांची परंपरा जतन करण्याचे दायित्व आम्ही जनतेने स्वच्छने स्वीकारले आहे.
५. देशातील लोकशाही टिकवण्यासाठी शिवशाही महत्त्वाची !
‘आलात तर तुमच्यासह, नाही आलात तर तुमच्या वाचून आणि विरोध कराल, तर तुमच्या विरोधाला न जुमानता आम्ही हे हिंदु राष्ट्र त्याच्या ऐतिहासिक, सांस्कृतिक, धार्मिक परंपरेसह अबाधित ठेवू’, हा स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी दिलेला मंत्र आणि त्यांनी गायलेली छत्रपती शिवरायांची आरती त्यासाठी आम्हाला सतत प्रेरणा देणारच आहे. ‘या देशात पुन्हा कोणतीही परकीय सत्ता प्रस्थापित होऊ देणार नाही’, हा हिंदु जनतेचा निर्धार आहे. हा निर्धार छत्रपती शिवरायांच्या शिवशाहीने आणि हिंदवी स्वराज्याच्या प्रेरणेने त्यांच्या मनात रुजवला आहे. तो सहजासहजी दूर करता येणे, हे कुणालाही शक्य नाही; कारण या देशातील लोकशाही टिकवण्यासाठी शिवशाही हाच एक बलदंड आधार आहे.
६. धर्मांध त्यांचे खरे स्वरूप दाखवल्याविना रहाणार नाहीत !
शिवशाहीला बाजूला सारून अस्तित्वात असलेली लोकशाही, म्हणजे प्राणवायूरहित असलेले वातावरण होय. छत्रपती शिवरायांचे पुतळे नष्ट करणार्या लोकांनी या गोष्टीकडे दुर्लक्ष करू नये. छत्रपती शिवरायांवर देशातील कोट्यवधी जनतेची असलेली श्रद्धाच या देशाची खरी शक्ती आहे. ज्यांच्या प्रेमाखातर तुम्ही छत्रपती शिवरायांशी वैरभाव व्यक्त करत आहात, ते त्यांच्यासाठी अनुकूल काळ येताच तुमची खांडोळी केल्याविना रहाणार नाहीत. ही गोष्ट जाणूनच आम्ही पुन्हा एकदा तुम्हाला सावध करण्यासाठी सांगत आहोत की, शिवशाहीच लोकशाहीचा मूलाधार आहे.
– श्री. दुर्गेश जयवंत परुळकर, हिंदुत्वनिष्ठ व्याख्याते आणि लेखक, डोंबिवली. (१९.८.२०२३)
छत्रपती शिवरायांचा पुतळा हटवायला हिंदूबहुल कर्नाटक भारतात आहे कि पाकिस्तानात ? |