नेवासा (अहिल्यानगर) येथे प्रवरा नदीत पशूवधगृहातील रक्तमिश्रीत पाणी सोडल्याविषयी ११ धर्मांधांवर गुन्हा नोंद !
कारवाईच्या मागणीसाठी सकल हिंदु समाजाकडून उपोषण !
नेवासा (जिल्हा अहिल्यानगर) – प्रवरा नदीच्या पात्रात रक्तमिश्रीत आणि दूषित पाणी सोडणार्यांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी सकल हिंदु समाजाच्या वतीने नेवासा नगरपंचायत कार्यालयासमोर उपोषण केले होते. (छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात अवैध पशूवधगृहांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी उपोषण करावे लागणे लज्जास्पद ! – संपादक) या मागणीच्या अनुषंगाने नेवासा नगरपंचायतीचे कर्मचारी ताराचंद चव्हाण, परशुराम डौले यांनी २ दिवसांपूर्वी शहरातील प्रभाग १३ आणि १६ मध्ये जाऊन पहाणी केली असता या भागात अवैध पशूवधगृह चालू असल्याचे निदर्शनास आले. त्या वेळी वरिष्ठांच्या आदेशानुसार चव्हाण यांनी पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली होती. या तक्रारीवरून शहरातील ११ धर्मांधांच्या विरोधात अवैध पशूवधगृह चालवून भुयारी गटाराद्वारे प्रवरा नदीच्या पात्रात रक्तमिश्रीत पाणी सोडल्याविषयी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
नेवासा शहरातील प्रवरा नदीच्या पात्रात काही दिवसांपासून दूषित पाणी सोडले जात आहे. याविषयी संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी येथील सकल हिंदु समाजाच्या वतीने निवेदनाद्वारे नगरपंचायतीकडे केली होती, तसेच उपोषण करण्याची चेतावणीही दिली होती. त्यानुसार सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी उपोषण केले. या उपोषणात सकल हिंदु बांधवांसह विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
नेवासा नगरपंचायतीचे कर्मचारी ताराचंद चव्हाण यांच्या तक्रारीवरून नेवासा पोलिसांनी मुश्ताक शेख, वाहिद चौधरी, अकील चौधरी, रियाद चौधरी, तोफिक चौधरी, जलाल चौधरी, सलीम भैय्या चौधरी, अबू चौधरी, अन्सार चौधरी, वसीम चौधरी, नदीम चौधरी यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे.
|