देवद (पनवेल) येथील सनातनच्‍या आश्रमातील ६१ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीचे (कै.) मिलिंद खरे (वय ६९ वर्षे) यांच्‍या निधनानंतर साधिकेला जाणवलेली सूत्रे आणि आलेली अनुभूती !

(कै.) मिलिंद खरे

१. मिलिंद खरे यांच्‍या निधनानंतर जाणवलेली सूत्रे

अ. ‘मिलिंद खरेकाका यांच्‍या पार्थिव देहाकडे पाहून ‘त्‍यांचे निधन झाले आहे’, असे मला वाटत नव्‍हते.

आ. त्‍यांचा चेहरा तेजस्‍वी, शांत आणि हसतमुख दिसत होता.

इ. त्‍यांच्‍याकडे पाहून ‘त्‍यांची आध्‍यात्मिक प्रगती झाली आहे’, असे मला वाटले.

(‘खरेकाकांच्‍या निधनानंतर त्‍यांची आध्‍यात्मिक पातळी ६१ टक्‍के असल्‍याचे घोषित करण्‍यात आले.’ – संकलक)

२. मिलिंद खरे यांच्‍या निधनाची वार्ता ऐकल्‍यापासून सातत्‍याने आणि आपोआप कृतज्ञता व्‍यक्‍त होणे

खरेकाकाकांचे निधन झाल्‍याची वार्ता ऐकल्‍यापासून माझ्‍या मनात पुढील विचार आले.

अ. खरेकाका भाग्‍यवान होते; म्‍हणून सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या कृपेने त्‍यांचा मृत्‍यू चैतन्‍यमय अशा सनातनच्‍या आश्रमात झाला.

आ. परात्‍पर गुरु डॉक्‍टरांच्‍या कृपेने काकांच्‍या जीवनाच्‍या शेवटच्‍या काळात ते आश्रमात आले आणि साधना केल्‍याने त्‍यांच्‍या जीवनाचे सार्थक झाले.

इ. ‘सनातनच्‍या चैतन्‍यमय आश्रमात काकांचे निधन होणे आणि सर्व साधकांच्‍या माध्‍यमातून त्‍यांच्‍या पार्थिव देहावर अंत्‍यसंस्‍कार होणे’, ही काकांवरील परम पूज्‍यांची कृपाच आहे.’

३. अनुभूती

काकांच्‍या निधनानंतर त्‍यांच्‍या नातेवाइकांची सेवा करतांना अत्‍यल्‍प विश्रांती घेऊनही थकवा न येता उत्‍साह वाटणे : काकांच्‍या निधनानंतर त्‍यांचे नातेवाईक आश्रमात आले होते. मला त्‍यांची सेवा करण्‍याची संधी मिळाली. ती सेवा पूर्ण होईपर्यंत रात्रीचे १२ वाजले होते आणि पुन्‍हा रात्री २ वाजल्‍यापासून संपूर्ण दिवस अन्‍य सेवा चालू होत्‍या, तरीही मी दमले नाही किंवा मला झोपही आली नाही. सेवा करतांना मला उत्‍साहच वाटत होता.’

– सुश्री (कु.) सविता जाधव, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (८.८.२०२३)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक