आधारकार्ड अद्ययावत करतांना सतर्क रहाण्याविषयी यु.आय.डी.ए.आय.ची सूचना
नवी देहली – आधारकार्ड अद्ययावत करण्याविषयी व्हॉट्सअॅप किंवा एस्.एम्.एस्. द्वारे येणार्या संदेशाविषयी सतर्क रहाण्याची सूचना ‘युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया’ अर्थात् ‘यु.आय.डी.ए.आय.’ने नागरिकांना दिली आहे.
UIDAI Warns Users Not to Share Documents to Update Aadhaar Card Through e-mail, WhatsApp#UIDAI #aadharcard #SCAM #Aadharhttps://t.co/qe0pu3juIc
— India.com (@indiacom) August 18, 2023
यु.आय.डी.ए.आय.ने म्हटले आहे की, आधारकार्ड ई-मेल किंवा ‘व्हॉट्सअॅप’वर अद्ययावत करण्यासाठी तुमची कागदपत्रे शेअर करण्यास कधीच सांगत नाही. त्यामुळे असा काही संदेश आला, तर त्या संदेशाकडे दुर्लक्ष करा. अशा संदेशावर विश्वास ठेवून तुम्ही जर तुमची महत्त्वाची कागदपत्रे शेअर केली, तर त्या कागदपत्रांचा अपलाभ घेतला जाऊ शकतो. त्यामुळे आधारकार्ड अद्ययावत करण्यासाठी केवळ अधिकृत मार्गांचाच वापर करा. तुम्ही आधारकार्डमध्ये ऑनलाईन पद्धतीने काही माहिती अद्ययावत करू शकता, तर काही माहिती अपडेट करण्यासाठी तुम्हाला ऑफलाईन कागदपत्रे जमा करावी लागतात. तुम्ही ऑनलाईन पद्धतीने नाव, लिंग, जन्मदिनांक, पत्ता आणि भाषा पालटू शकता. ऑनलाईन दुरुस्तीसाठी, सुधारणेसाठी तुमचा १० अंकी भ्रमणभाष क्रमांक आधारकार्डशी लिंक असणे आवश्यक आहे. तसेच, जवळच्या आधार केंद्रावर जाऊनही तुम्ही ऑफलाईन पद्धतीने आधारकार्ड अद्ययावत करून घेऊ शकता.