‘इस्रो’च्या भरती परीक्षेत ‘कॉपी’ करतांना पकडल्या गेलेल्या दोन परिक्षार्थींना हरियाणातून अटक !
थिरूवनंतपूरम् (केरळ) – ‘विक्रम साराभाई अंतराळ केंद्रा’त (‘व्ही.एस्.एस्.सी.’मध्ये) तांत्रिक कर्मचार्यांच्या भरतीसाठी ‘इस्रो’ने आयोजित केलेल्या परीक्षेत कॉपी करण्याच्या आरोपाखाली हरियाणाच्या २ परीक्षार्थींना अटक करण्यात आली आहे. एका वरिष्ठ पोलीस अधिकार्याने सांगितले की, त्याला अन्य एका व्यक्तीने या प्रकरणाची दूरभाषवरून सूचना केल्यावर पोलिसांनी ही कारवाई केली.
भारतीय अंतरिक्ष अनुसंधान संगठन (ISRO) द्वारा आयोजित एक भर्ती परीक्षा में ‘मुन्ना भाई’ स्टाइल में नकल करते हुए दो उम्मीदवार गिरफ्तार #ISRO https://t.co/E5xj1aC3Un
— AajTak (@aajtak) August 21, 2023
पोलिसांनी सांगितले की, दोघे परिक्षार्थी परिक्षेत विचारलेल्या प्रश्नांची छायाचित्रे काढून ती भ्रमणभाषद्वारे अन्य एका व्यक्तीला पाठवत होते. ती व्यक्ती त्या प्रश्नांची उत्तरे भ्रमणभाष करून दोघांना सांगत होती. दोघे परिक्षार्थी ‘ब्लूटूथ डिवाईस’द्वारे ते ऐकत होते.