परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या सत्‍संगाच्‍या वेळी ‘स्‍थुलापेक्षा सूक्ष्म श्रेष्‍ठ आहे’, याची कु. मोक्षदा कोनेकर (वय १२ वर्षे) हिला आलेली अनुभूती !

अनुभूतींच्या माध्यमातून साधकांना आनंद देणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
कु. मोक्षदा कोनेकर

‘एकदा मला परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांचा अमूल्‍य सत्‍संग लाभला. त्‍यापूर्वी ‘माझ्‍या समवेत कुणीतरी आहे’, असे मला जाणवले. नंतर सौ. स्‍वाती संदीप शिंदे (आध्‍यात्मिक पातळी ६५ टक्‍के, ) यांनी भावजागृतीचा एक प्रयोग करण्‍यास सांगितला. त्‍या म्‍हणाल्‍या, ‘‘परात्‍पर गुरु डॉक्‍टर इथे सूक्ष्मातून आले आहेत’, असे आपण अनुभवूया.’’ तेव्‍हा मला ‘स्‍थुलापेक्षा सूक्ष्म श्रेष्‍ठ आहे आणि स्‍थुलातून कार्य होण्‍यापूर्वी ते सूक्ष्मातून झालेले असते’, या वाक्‍याची आठवण झाली. त्‍या वेळी ‘परात्‍पर गुरु डॉक्‍टर येण्‍यापूर्वी ‘कुणीतरी माझ्‍या समवेत आहे’, असे मला का वाटले ?’, याचा मला उलगडा झाला आणि ‘तेव्‍हा माझ्‍या समवेत साक्षात् परात्‍पर गुरु डॉक्‍टरच होते’, याची मला जाणीव झाली.’

– प.पू. गुरुदेवांचे आनंदी फूल,

कु. मोक्षदा मयुरेश कोनेकर (आताची आध्‍यात्मिक पातळी ६१ टक्‍के, आताचे वय १२ वर्षे), फोंडा, गोवा. (२९.१०.२०२१)

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक