नूंह (हरियाणा) येथे धर्मांधांनी केलेल्‍या हिंसाचाराचे सत्‍य !

नूंह येथील दंगलीतील हिंसाचाराचे एक दृश्‍य

१. नूंह येथे हिंदूंच्‍या जलाभिषेक यात्रेवर धर्मांधांकडून भीषण आक्रमण !

‘जो कुणी नूंह (मेवात)मधील हिंसाचाराकडे खोलवर पाहील, तो चिंतित आणि घाबरून जाईल. मी स्‍वतःसह भारत रावत आणि जमात उलेमा-ए-हिंदचे प्रमुख मौलाना सोहेब कासमी यांच्‍यासमवेत संचारबंदी आणि भीतीच्‍या वातावरणात हिंसाचार झालेल्‍या सर्व ठिकाणी गेलो. परिसरातील काही लोकांना भेटण्‍याचा प्रयत्न केला, त्‍यांच्‍याशी बोलून परिस्‍थिती समजून घेतली. याआधी कोणत्‍याही धार्मिक यात्रेविषयी भारतात अशा प्रकारचा हिंसाचार झाला नव्‍हता. जे लोक याला दोन बाजूंमधील सामान्‍य तणाव किंवा संघर्ष म्‍हणून पहातात, त्‍यांनी एकदा तेथे स्‍वतः जाऊन सत्‍य पहावे. कोणत्‍याही हिंसाचारात, तणावात किंवा समस्‍येत सत्‍य लपवण्‍याचा प्रयत्न झाला, तर ना खरे गुन्‍हेगार पकडले जातील, ना त्‍याची पुनरावृत्ती होण्‍याची शक्‍यता संपुष्‍टात येईल. मग सत्‍य काय आहे ?

जलाभिषेक यात्रा नलहर महादेव मंदिरापासून निघून फिरोजपूर झिरका येथे जाणार होती. हे मंदिर अरवली डोंगराच्‍या पायथ्‍याशी आहे. तेथून बाहेर पडण्‍यासाठी एकच रस्‍ता आहे, जो नूंह शहराकडे येतो. पुढे दोन रस्‍ते येतात, ज्‍यात एक वैद्यकीय महाविद्यालयापासून नूंह शहरात जातो आणि दुसरा थेट नूंह शहरातून मुख्‍य महामार्गावर जातो. मंदिरापासून दूरवर वस्‍ती नाही. यात्रा चालू झाल्‍यापासून ५० यार्ड (१५० फूट) अंतरावर तुम्‍हाला वाहनांचे जळलेले अवशेष आणि इतर साहित्‍य दिसू लागेल. पोलिसांनी जळलेल्‍या वाहनांचे अवशेष पूर्णपणे काढून टाकले आणि स्‍वच्‍छ केले, तरीही हे आक्रमण किती भीषण असेल, हे दाखवते.

दंगलीत जाळलेली वाहने

२. यात्रेत सहभागी हिंदुत्‍वनिष्‍ठ तरुणाचा शिरच्‍छेद !

जर तेथे वस्‍तीच नाही, तर मग एवढी वाहने जाळण्‍याचे कारण काय ? ‘यात्रा पुढे निघाली, काही लोक पुढे गेले, काही मध्‍यभागी राहिले आणि मधूनच आक्रमणे चालू झाली’, अशी माहिती मिळाली. जीव वाचवण्‍यासाठी लोकांना परत मंदिराकडे धाव घ्‍यावी लागली. प्रवासात महिला आणि लहान मुलेही होती. मागून डोंगरावरून गोळ्‍या झाडल्‍या जात असल्‍याचे सांगण्‍यात येत आहे. पुढे गेलेल्‍या काहींवर पुढेही आक्रमण करण्‍यात आले.

ज्‍या अभिषेकला गोळ्‍या घालून शिरच्‍छेद झाल्‍याची बातमी मिळाली, ते ठिकाण वैद्यकीय महाविद्यालय चौकापासून थोडे पुढे आहे. कुठलीही यात्रा चालू झाली की, काही लोक मोटारसायकल किंवा चारचाकी वगैरेने पुढे जातात. त्‍यामुळे रस्‍ता मोकळा होऊन यात्रा निघण्‍यासाठी व्‍यवस्‍था केली जाते. त्‍यातच अभिषेक पुढे निघून गेला होता. तेथे गेल्‍यावर समजले की, जीव वाचवून मंदिरात लपलेल्‍या लोकांना सोडवण्‍यात पोलिसांना वेळ का लागला असेल ? किंंबहुना मंदिरासमोरील रिकाम्‍या जागेतून किंवा त्‍यापलीकडे असलेल्‍या वस्‍तीतून दगडफेक, गोळ्‍या झाडणे आणि पोलिसांशी झालेली चकमक एवढी तीव्र होती की, कुणाला तरी घेऊन जाणे धोक्‍याचे होते. पोलिसांनी काही घंटे हिंसक घटकांना आवर घालण्‍याचा प्रयत्न केला; परंतु उशीर झाल्‍यामुळे गोळीबारापासून वाचण्‍यासाठी कवच देत आणि गराडा घालून पोलिसांच्‍या वाहनांमध्‍ये थोड्या संख्‍येने पोलिसांनी त्‍यांना हळूहळू बाहेर काढण्‍यास प्रारंभ केला. रात्री उशीर झाला. संचारबंदी आणि तणाव यांमुळे तेथे नेते शोधण्‍यासाठी आणि भेटणे कठीण होते.

३. धर्मांधांचा सहस्रो हिंदूंना ठार मारण्‍याचा कट फसला ! 

आम आदमी पक्षाचे नेते फखरुद्दीन अली यांची शहरातील त्‍यांच्‍या घरी भेट झाली. ‘अशा प्रकारे धार्मिक यात्रेवर आक्रमण होण्‍याची कल्‍पनाही करता येणार नाही’, असे ते म्‍हणाले. आधी हाणामारी झाली, पोलीस आले, त्‍यांनी हवेत गोळीबार केला आणि लाठीमार केला की, लोक पळून जायचे. या वेळी त्‍यांनी पोलिसांसमवेत ज्‍या प्रकारे ‘बॅरिकेडिंग’ (अडथळे निर्माण करणे) करून चौफेर आक्रमण केेले आणि जाळपोळ केली, त्‍यावरून संपूर्ण नियोजन करण्‍यात आल्‍याचे स्‍पष्‍ट होते. त्‍यांचे म्‍हणणे होते की, हे नियोजन आपल्‍या मेवातमध्‍ये नसून बहुधा राजस्‍थानच्‍या परिसरात झाले असावे. नूंह जिल्‍हा आणि संपूर्ण मेवात एका बाजूला राजस्‍थानच्‍या अलवरशी लागून आहे अन् दुसर्‍या बाजूला मथुरा अन् भरतपूर यांच्‍याशी जोडलेले आहे. काही लोकांनी असेही सांगितले की, जर यात्रा नूंह सोडून बडकालीला पोचली असती, तर काही सहस्र लोकांचा मृत्‍यू झाला असता. हा प्रवास १०० यार्डही (३०० फूट) टिकू शकला नाही, हे लक्षात ठेवा.

४. धर्मांध दंगलखोरांचा सायबर पोलीस ठाण्‍याच्‍या नोंदी नष्‍ट करण्‍याचा प्रयत्न !

नूंह शहरातही हिंसाचार घडवून आणणारे गट विविध दिशेने विभागले गेले, त्‍यामुळे मृत आणि घायाळ यांची संख्‍या फारच अल्‍प होती. काही दुकाने लुटून जाळण्‍यात आली, तर काहींनी बस थांबवून लोकांना उतरवून त्‍यांना आग लावली. नूंह सायबर पोलीस ठाण्‍याचे दृश्‍यही तुम्‍हाला बरेच काही समजावून सांगेल. बसची तोडफोड करून ती कह्यात घेण्‍यात आली आणि ती चालवतांना सायबर पोलीस ठाण्‍याची भिंत फोडण्‍यात आली, तसेच पोलिसांच्‍या वाहनांची मोडतोड करण्‍यात आली. दंगलखोरांचा उद्देश सायबर पोलीस ठाण्‍याच्‍या नोंदी नष्‍ट करण्‍याचा होता, हे स्‍पष्‍ट होते. मेवात हे सायबर गुन्‍ह्यांचे देशातील सर्वांत मोठे केंद्र आहे. गेल्‍या काही दिवसांमध्‍ये तेथे ३०० हून अधिक धाडी टाकण्‍यात आल्‍या आणि मोठ्या प्रमाणात लोकांना अटक करण्‍यात आली. त्‍यात असे साहित्‍य जप्‍त करण्‍यात आले, जे आश्‍चर्यकारक आहे.

५. बसगाड्या आणि खासगी चारचाकी वाहने यांची प्रचंड जाळपोळ !

दुसरीकडे काही चित्रफितींमुळे तणावाचे वातावरण होते किंवा यात्रा काढणार्‍यांनी तणावाची परिस्‍थिती निर्माण केली, तर त्‍यामुळे सायबर पोलीस ठाण्‍यावर आक्रमण करण्‍याचे कारण नसावे. रस्‍त्‍यावर धावणार्‍या बसेसमधून लोकांचा अपमान करणे आणि त्‍या बसेस जाळणे, हेही कारण असू शकत नाही. काही आक्षेपार्ह किंवा प्रक्षोभक असेल, तर पोलीस प्रशासनाला कळवायला हवे होते, इतक्‍या ठिकाणी झालेली भीषण आक्रमणे योग्‍य नाहीत. पोलीस ठाण्‍याचे अवशेष आणि तेथे पडलेली जळालेली वाहने पाहिल्‍यास थक्‍क व्‍हायला होते. सामान्‍य चारचाकी वाहनांमध्‍ये लोखंडाखेरीज काहीच उरले नाही.

बसगाड्यांची अवस्‍थाही जवळपास तशीच आहे. अशा प्रकारे वाहने जाळणे, हे पूर्ण प्रशिक्षित आणि व्‍यावसायिक लोकांचे काम आहे. क्षणिक राग आणि उत्‍साह यांमध्‍ये वाहनांची किंचित् हानी  होऊ शकते, ते काही मिनिटांमध्‍ये जाळून नष्‍ट होऊ शकत नाही. सिद्धता केली, प्रशिक्षण झाले आणि सामुग्री जमवली गेली, हे लक्षात येते. एवढ्या प्रमाणात पेट्रोल साठवता येत नाही आणि काही मिनिटांत अन् घंट्यांमध्‍ये वितरीतही करता येत नाही. मंदिरापासून पुढे निर्जन भागात ‘सीसीटीव्‍ही’ छायाचित्रक नव्‍हते. त्‍यामुळे आक्रमणकर्ते दिसून येत नाहीत. पुढील काही चित्रफीत उपलब्‍ध आहेत. काही इमारती बुलडोझरच्‍या साहाय्‍याने पाडण्‍यात आल्‍या. त्‍यातून दगड आणि इतर साहित्‍य फेकले जात असल्‍याचे दिसून आले. लोकांनी छतावरून दगडफेक होतांना पाहिली. या दंगलीत पेट्रोल बाँबही फेकले गेले. ज्‍या सहारा हॉटेलमध्‍ये सर्वाधिक दगड आणि इतर वस्‍तू सापडल्‍या आहेत, ते ठिकाण पोलीस ठाण्‍यापासून काही यार्डांच्‍या अंतरावर आहे. अरवलीच्‍या डोंगरातून दगड कापले जातात. त्‍यांना घेऊन जाणार्‍या डंपरची संख्‍या पुरेशी आहे. त्‍यामुळे कुठेही दगड आढळले, तर शंका येणार नाही.

६. नूंहमधील भाजप नेत्‍याची ‘ऑईल मिल’ जळून खाक  !

नूंहपासून २० किलोमीटर अंतरावर असलेल्‍या बडकलीची स्‍थितीही बिकट होती. तेथे नूंह जिल्‍हा भाजप सरचिटणीस यांच्‍या ‘ऑईल मिल’वर दुपारी आक्रमण झाले. ती पूर्णपणे जळून खाक झाली आणि तेथे उभी असलेली दोन वाहनेही आगीच्‍या भक्ष्यस्‍थानी पडली. रात्री १२ नंतर पोलीस तेथे पोचल्‍याचे लोकांनी सांगितले. तेथे २०-२० दुकाने जळून खाक झाली असून ती एकाच समाजातील लोकांची आहेत. कधी आक्रमण होईल, हे सांगता येत नाही. त्‍यामुळे भीतीपोटी दुकानांच्‍या संरक्षणासाठी रात्री गस्‍त घालावी लागते, असे लोकांनी सांगितले.

मुख्‍य चौकात केंद्रीय सशस्‍त्र पोलीस दलाचे काही कर्मचारी आहेत; पण सुरक्षेसाठी पोलीस नाहीत. ‘एवढ्या दूर असलेल्‍या दुकानांना लक्ष्य का करण्‍यात आले ?’, हा प्रश्‍न आहे. एवढ्या भीषण आगीसाठी साहित्‍य आणि इतके लोक अचानक येऊ शकत नाही. एका समाजाची दुकाने लुटून जाळण्‍यात आली. अशा प्रकारे संपूर्ण हिंसाचाराचे चित्र काढले, तर त्‍यामागे पुष्‍कळ दिवसांपासून मोठी पूर्वसिद्धता होती, हे स्‍पष्‍टपणे दिसते. सभा घेतल्‍याखेरीज, लोकांना सिद्ध केल्‍याखेरीज, त्‍यांना संसाधने पुरवल्‍याखेरीज आणि प्रशिक्षण दिल्‍याखेरीज अशा प्रकारचा हिंसाचार शक्‍य नाही. काही लोक गुन्‍हे करतात आणि त्‍याचे परिणाम संपूर्ण समाजाला भोगावे लागतात. मेवात भय आणि तणाव यांमधून जात आहे.

७. दंगल पीडितांना हानीभरपाई मिळणे आवश्‍यक !

पोलीस प्रशासनाचे अपयश उघड आहे. दुपारी १२ वाजल्‍यानंतर काही वेळातच यात्रेवर आक्रमण झाले. यात्रेच्‍या समवेत असलेल्‍या मोजक्‍या पोलिसांना जीव वाचवावा लागला. या आक्रमणांमुळे लोकांना मंदिराकडे धाव घ्‍यावी लागली. दुपारी ५ वाजण्‍याच्‍या सुमारास पोलीस तेथे पोचले. संपूर्ण शहर आक्रमणकर्त्‍यांच्‍या तावडीत होते. ही परिस्‍थिती पालटणे आवश्‍यक आहे.  ज्‍यांच्‍यावर आक्रमण झाले, ज्‍यांची दुकाने जाळली गेली, त्‍यांना तात्‍काळ संपूर्ण हानीभरपाई मिळावी. त्‍यांच्‍यात सुरक्षेची भावना निर्माण झाली पाहिजे. हिंसाचार करणार्‍यांना आणि ते घडवून आणणार्‍यांना त्‍यांच्‍या गुन्‍ह्यांची शिक्षा होईल, असे वाटले पाहिजे. हे सर्व दायित्‍व प्रशासन आणि शासन यांचे आहे. यासमवेतच राजकीय, अराजकीय, धार्मिक आणि सामाजिक गट यांनीही पुढे यायला हवे. दोन समाजांमध्‍ये जाणे, त्‍यांच्‍यातील अविश्‍वास अल्‍प करणे आणि जिहादी विचारांच्‍या दिशेने गेलेल्‍या तरुणांना पुन्‍हा मुख्‍य प्रवाहात आणणे आवश्‍यक आहे. यासाठी दीर्घकाळ काम करावे लागेल.’

– अवधेश कुमार

(साभार : ‘विश्‍व संवाद केंद्र, भारत’चे संकेतस्‍थळ)

संपादकीय भूमिका

नूंह येथे झालेल्‍या हिंसाचाराच्‍या पूर्वनियोजनाचा सुगावा गुप्‍तचर यंत्रणांना न लागणे, हे त्‍यांचे अपयशच !