प्रबोधनानंतर जिन्याच्या पायर्यांवरील विडंबन करणार्या ‘श्रीराम फायनान्स’च्या पट्ट्या काढल्या !
लांजा – येथील व्यापारी संकुलामध्ये ‘श्रीराम फायनान्स गोल्ड लोन’ या आस्थापनाचे कार्यालय आहे. हे आस्थापन दुसर्या मजल्यावर असल्याने तेथे जाण्यासाठी जिन्याचा वापर करावा लागतो. या जिन्याच्या प्रत्येक पायरीवर विज्ञापन करण्याच्या उद्देशाने ‘श्रीराम फायनान्स गोल्ड लोन’ असे लिहिण्यात आले होते. येथील २ हिंदु धर्माभिमानांच्या ‘प्रत्येक पायरीवर श्रीरामाचे नाव लिहिल्याने हे देवतेचे विडंबन होत आहे, हे योग्य नव्हे.’, ही गोष्ट लक्षात आली. तेव्हा त्यांनी येथील बजरंग दल कार्यकर्त्यांशी संपर्क केला आणि देवतांचे विडंबन कसे होते? ते सांगितले.
सर्व घटना ऐकल्यानंतर बजरंग दलाचे कार्यकर्ते व्यापारी संकुलाच्या मालकांना भेटून त्यांना देवतेचे विडंबन कसे होते? याची वस्तूस्थिती सांगितली. त्यानंतर त्या मालकांनी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना सकारात्मक प्रतिसाद देत सांगितले की, आपण ते तातडीने काढून टाकले पाहिजे. मी तुमच्या मताशी सहमत आहे. कुठेही आणि कुणाकडूनही आपल्या देवतांचे विडंबन होता कामा नये.
यानंतर बजरंग दलाचे कार्यकर्ते ‘श्रीराम फायनान्स गोल्ड लोन’च्या अधिकार्यांनाही भेटले. त्यांनाही सर्व वस्तूस्थिती अवगत केली आणि पायरीवर लावलेल्या श्रीरामाच्या विज्ञापनाच्या पट्ट्या काढण्याची विनंती केली. प्रबोधन केल्यानंतर त्या अधिकार्यांनी त्वरित पट्ट्या काढल्या. त्या वेळी अधिकारी म्हणाले, ‘‘आमच्या ‘श्रीराम फायनान्स गोल्ड लोन’च्या प्रत्येक शाखेमध्ये अशा विज्ञापनाची मोहीम चालू आहे. त्या ठिकाणीही श्रीरामाच्या जाहिरातीच्या पट्ट्या लावल्या जाऊ नयेत, यासाठी तुम्हाला शब्द देतो.’’
संपादकीय भूमिकादेवतांच्या विडंबनाविषयी प्रबोधन करून धर्महानी रोखणार्या बजरंग दल कार्यकर्त्यांचे अभिनंदन ! असे कार्यकर्ते हीच हिंदु धर्माची शक्ती आहे ! |