नागपंचमीचे माहात्म्य
आज नागपंचमी आहे. त्या निमित्ताने…
श्रावण शुक्ल पंचमीला ‘नागपंचमी’ म्हणतात. या दिवशी भिंतीवर काढलेल्या नागांची किंवा कुलाचाराप्रमाणे नागदेवतेची पूजा करतात. नागदेवता ही धनाची रक्षक आहे. नागदेवतेला लाह्या, दुधाचा नैवेद्य दाखवून संपत्ती रक्षणाची प्रार्थना केली जाते.
(साभार : ‘धर्मक्षेत्र नाणीजधाम’, ऑगस्ट २०११)
नाग हा प्राणी शेतकर्याचा मित्र असतो. नाग शेतातील उंदीर खाण्याचे काम करून पिकांचे रक्षण करतो. नागपंचमीच्या दिवशी नागाची पूजा करतात. हिंदु धर्मात नागाला ‘नागदेवता’ म्हणून मानतात.
– सौ. सुलभा शिवराम कोल्हटकर
(साभार : मासिक ‘ललना’, जून २०१८)