(म्हणे) ‘विद्यापिठाच्या आवारात मद्यप्राशन करणे, हा आमचा अधिकार !’-मद्यप्रेमी विद्यार्थिनी
मद्यप्रेमी विद्यार्थिनीचा थयथयाट !
कोलकाता – बंगालच्या कोलकाता येथील जाधवपूर विद्यापिठातील एक व्हिडिओ प्रसारित झाला आहे. या व्हिडिओमध्ये विद्यार्थी विद्यापीठ परिसरात ‘सीसीटीव्ही’ बसवण्यास विरोध करतांना दिसत आहेत. यामध्ये श्रीजाता नावाच्या एका विद्यार्थिनीने ‘विद्यापिठाच्या आवारात मद्यप्राशन करणे योग्य आहे’, असे म्हटले आहे. एवढेच नाही, तर ‘प्रत्येकाने विद्यापिठात बसून दारू प्यावी’, असेही तिने म्हटले आहे.
“The institution is like our second home, so we have the right to drink and smoke inside it.”
Average woke bong from Jadavpur University pic.twitter.com/UHc76QYvob
— BALA (@erbmjha) August 19, 2023
विद्यापिठात दारू पिण्याची वकिली करतांना श्रीजाता म्हणाली की, आम्ही विद्यापिठाला आमचे दुसरे घर मानतो. त्यामुळेच विद्यापीठ परिसरात दारू प्यायची आणि सिगारेट ओढायची असेल, तर तो आमचा अधिकार आहे. (विद्यापीठ हे विद्यादानाचे केंद्र आहे. अशा पवित्र ठिकाणी दारू पिणे आणि सिगारेट ओढण्याची अनुमती देण्याची मागणी करणार्या विद्यार्थ्यांना बडतर्फ करून घरी बसवणे आवश्यक ! – संपादक)
९ ऑगस्ट २०२३ या दिवशी जादवपूर विद्यापिठाचा विद्यार्थी स्वप्नदीप कुंडू याचा दुसर्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला होता. विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतर विद्यापिठात सीसीटीव्ही बसवले जात आहेत; मात्र काही विद्यार्थी याला विरोध करत आहेत. (या विद्यार्थ्यांना अशा मृत्यूच्या घटनांमध्ये वाढ व्हावी, असे वाटते का ? – संपादक)
संपादकीय भूमिका
|