शेवगाव (जिल्हा अहिल्यानगर) येथील श्री रेणुकामाता मंदिरात चोरी !
शेवगाव (जिल्हा अहिल्यानगर) – अमरापूर येथील श्री रेणुकामाता मंदिरातील मूर्तीचा लाखो रुपयांचा सोने चांदीचा साज चोरीला गेल्याची घटना १८ ऑगस्टला सकाळी उघडकीस आली. चोरीची माहिती समजताच शेवगाव पोलीस आणि ठसेतज्ञ घटनास्थळी पोचले. मंदिर आणि मंदिर परिसरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्ये चोरट्यांच्या हालचाली टिपण्यात आली आहे. विशेष म्हणजे येथे ५ सुरक्षारक्षक रात्रीच्या वेळी गस्त देत होते, त्यांनाही याची माहिती झाली नाही. मंदिराच्या बाहेरील ‘ग्रिल’चे कुलूप तोडून चोरांनी आत प्रवेश केला. नंतर गाभार्याच्या दरवाजाचे कुलूप तोडले आणि मूर्तीच्या अंगावरील सोन्या चांदीचे दागिने आणि इतर वस्तू चोरून नेल्या. सकाळी पुजारी मंदिरात गेल्यावर त्यांना ही घटना निदर्शनास आली.
संपादकीय भूमिकाहिंदूबहुल भारतात हिंदूंचीच मंदिरे असुरक्षित ! प्रत्येक हिंदू खर्या अर्थाने धर्माभिमानी झाल्यास मंदिरांकडे वक्रदृष्टीने पहाण्याचे कुणाचेही धाडस होणार नाही ! |