दादर (मुंबई) येथे अल्पवयीन हिंदु मुलीची छेड काढणार्या मुसलमान युवकाला नागरिकांकडून चोप !
मुंबई, २० ऑगस्ट (वार्ता.) – दादर (पूर्व) येथील हिंदमाता चित्रपटगृह येथे अल्पवयीन हिंदु मुलीचा पाठलाग करून तिची छेड काढणार्या मुसलमान युवकाला नागरिकांनी चोप दिला. या वेळी युवकाने स्वत:ची हिंदु असल्याचे सांगितले; मात्र नागरिकांनी ओळखपत्र पडताळले असता आधारकार्डवरून तो मुसलमान असल्याचे आढळून आले. काही दिवसांपूर्वी हा प्रकार घडला.
याविषयी अल्पवयीन मुलीने सांगितले की, मुसलमान युवक परळ येथून तिचा पाठलाग करत होता. हिंदमाता चित्रपटगृहाच्या ठिकाणी आल्यावर मुसलमान युवकाने ‘तू मला आवडतेस. माझ्याशी लग्न करशील का ?’ असे म्हणत तिच्याशी सलगी करण्याचा प्रयत्न केला. घाबरल्याने तिने आरडाओरडा केल्यावर आजूबाजूचे दुकानदार आणि विक्रेते धावत आले. तोपर्यंत मुसलमान युवक पळत सुटला. या वेळी तेथे जमलेल्या नागरिकांनी पाठलाग करून मुसलमान युवकाला पकडले. ही अल्पवयीन मुलगी दादर (पूर्व) परिसरात रहाते. तिची आर्थिक परिस्थितीती बेताची असल्यामुळे येथील सर्व दुकानांमध्ये ही आठवड्यातून १-२ वेळा उदबत्त्यांची विक्री करण्यासाठी येते. त्यामुळे येथील सर्व स्थानिक दुकानदार आणि विक्रेते मुलीला ओळखतात. या वेळी नागरिकांनी छेड काढणार्या मुसलमान युवकाला भोईवाडा पोलीस ठाण्यात नेले.
तक्रारीअभावी पोलिसांनी समज देऊन सोडले !गुन्हेगारांना मोकाट सोडणारे मुंबई पोलीस ! पोलिसांना समाजात खरोखरच कायदा आणि सुव्यवस्था राखायची असती, तर पोलिसांनी स्वतःहून या युवकाविरुद्ध तक्रार करून त्याला गजाआड केले असते. गुन्हा घडलेला ढळढळीत दिसत असतांनाही पोलिसांनी स्वतःहून युवकाच्या विरोधात तक्रार का केली नाही ? कि पोलीस अशांना नेमीच पाठीशी घालतात ? अशा पोलिसांना तात्काळ बडतर्फ करा ! याविषयीचा व्हिडिओ प्राप्त झाल्यावर दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीने २० ऑगस्ट या दिवशी भोईवाडा पोलीस ठाण्यामध्ये जाऊन या प्रकरणी पीडितेचीछेड काढणार्या युवकाच्या विरोधात कोणती कारवाई केली ? याविषयी माहिती विचारली असता या प्रकरणात मुलीकडून कुणीही तक्रार प्रविष्ट केलेली नसल्यामुळे युवकाला समज देऊन सोडून देण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. (असे लव्ह जिहादचे प्रकार रोखण्यासाठी पीडित युवती आणि हिंदु समाज यांनी तक्रार करण्यासाठी पुढाकार घ्यावा ! – संपादक) |
संपादकीय भूमिकाअशा वासनांध धर्मांधांचा प्रतिकार करण्यासाठी सरकारने सर्वत्रच्या युवती आणि महिला यांना स्वसंरक्षण प्रशिक्षण द्यायला हवे ! |