सेवानिवृत्त शिक्षकाची दिवसाढवळ्या गोळ्या झाडून हत्या !
|
बेगूसराय (बिहार) – बिहारच्या अररिया येथे २ दिवसांपूर्वी विमल यादव या पत्रकाराची त्याच्या घरात गोळ्या झाडून हत्या केल्याच्या घटनेनंतर आता बेगूसराय येथे एका सेवानिवृत शिक्षकाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. जवाहर चौधरी असे हत्या करण्यात आलेल्या निवृत्त शिक्षकाचे नाव आहे. २ वर्षांपूर्वी चौधरी यांच्या लहान मुलाची भूमीच्या वादातून गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या हत्येचे ते साक्षीदार होते. जवाहर चौधरी सकाळी चालण्यासाठी बाहेर गेले असता दुचाकीवरून आलेल्या मारेकर्यांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. यात घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला.
बेगूसराय में बदमाशों ने रिटायर्ड शिक्षक की गोली मारकर की हत्या। pic.twitter.com/ADsrrRPDi2
— News18 Bihar (@News18Bihar) August 20, 2023
संपादकीय भूमिकाबिहारमध्ये कायद्याचे राज्य नसल्याचेच ही घटना द्योतक आहे ! राज्यातील जनता दल (संयुक्त) आणि राष्ट्रीय जनता दल यांचे सरकार कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात अपयशी ठरले असून जनतेने सरकारला यासाठी जाब विचारला पाहिजे ! |