कर्नाटकमध्ये चाचणीच्या वेळी स्वदेशी बनावटीचे ‘तपस’ ड्रोन कोसळले !
चित्रदुर्ग (कर्नाटक) – ‘संरक्षण संशोधन आणि विकास संस्थे’ने (‘डी.आर्.डी.ओ.’ने) विकसित केलेले स्वदेशी बनावटीचे ‘तपस’ ड्रोन चित्रदुर्ग जिल्ह्यातील एका गावामध्ये चाचणीच्या वेळी कोसळले. ‘अपघातामागील कारणांची चौकशी केली जात आहे’, अशी माहिती संरक्षण अधिकार्यांनी दिली.
#WATCH | A Tapas drone being developed by the DRDO crashed today during a trial flight in a village of Chitradurga district, Karnataka. DRDO is briefing the Defence Ministry about the mishap and an inquiry is being carried out into the specific reasons behind the crash: Defence… pic.twitter.com/5YSfJHPxTw
— ANI (@ANI) August 20, 2023
वर्ष २०१६ पासून ‘तपस’चे उत्पादन चालू करण्यात आले आहे. पाळत ठेवण्यात आणि प्रसंगी आक्रमण करण्यास हे ड्रोन सक्षम आहे. लवकरच या ड्रोनचा तिन्ही सैन्यदलांमध्ये समावेश करण्यात येणार असून त्याच अनुषंगाने याच्या चाचण्या चालू आहेत. हे ड्रोन २२४ किलोमीटर वेगाने जवळपास १ सहस्र किलोमीटरपर्यंत उड्डाण करू शकते. यात २४ घंटे ना थांबता उडण्याची क्षमता असून भूमीपासून कमाल ३५ सहस्र फूट वर उडू शकते.