गणेशभक्तांनो, ‘गणपतीला गावी जात आहे’, असे न म्हणता ‘श्री गणेशचतुर्थीसाठी गावी जात आहे’, असा योग्य शब्दप्रयोग करावा !

“श्री गणेशचतुर्थीला गावी जात आहे”

‘अनेक गणेशभक्त परगावांतून श्री गणेशचतुर्थीसाठी स्वत:च्या गावी जातांना ‘मी गणपतीला किंवा गणपतीसाठी गावी जात आहे किंवा गणपतीची सिद्धता (तयारी) करत आहे’, असे म्हणतात. वस्तूत: आपण गणपतीसाठी गावी जात नसतो, तर त्याचे आशीर्वाद घेण्यासाठी जात असतो, तसेच गणेशोत्सवासाठी घराची स्वच्छता आदी सिद्धता करत असतो. हे लक्षात घेता गणपतीच्या नावाचा उल्लेख वाक्यात योग्यप्रकारे न केल्यास त्या वाक्याचा चुकीचा अर्थ होतो. त्यामुळे देवतांच्या नावांचा उल्लेख करतांना योग्य ती काळजी घ्यावी. अशा वेळी ‘श्री गणेशचतुर्थीला किंवा गणपतीचे आशीर्वाद घेण्यासाठी गावी जात आहे किंवा श्री गणेशचतुर्थीसाठी सिद्धता करत आहे’, असे म्हणावे.’

हे वाचा :

“श्री गणेशचतुर्थीसाठी सिद्धता”