गोवा : ‘सनबर्न’ महोत्सवाच्या आयोजनासाठी अर्ज
पणजी, १९ ऑगस्ट (वार्ता.) – ‘सनबर्न’ या पाश्चात्त्य संगीत आणि नृत्य असलेल्या इलेक्ट्रॉनिक संगीत महोत्सवाचे ‘पर्सेप्ट’ यांनी यंदा २७ ते ३१ डिसेंबर या कालावधीत गोव्यात आयोजन करण्यासाठी पर्यटन खात्याकडे अर्ज केला आहे.‘पर्सेप्ट’ या आयोजक संस्थेच्या मते वागातोर येथे महोत्सव भरवण्यास अडचण असल्याने तो अन्यत्र भरवण्यासही सिद्ध आहे. ‘पर्सेप्ट’ गेली १६ वर्षे गोव्यात ‘सनबर्न’ महोत्सवाचे आयोजन करत आहे. वर्ष २०२१ मध्ये कोरोना महामारीमुळे हा महोत्सव आयोजित करता आला नाही.
संपादकीय भूमिका
|