प्रभु श्रीरामाचा अवमान करणार्या बेलापूर (अहिल्यानगर) येथील धर्मांधाला अटक !
घटनेच्या निषेधार्थ कडकडीत बंद !
श्रीरामपूर (जिल्हा अहिल्यानगर) – प्रभु श्रीरामाविषयी बेलापूर येथील आदिल शेख याने त्याच्या ‘इंस्टाग्राम अकाऊंट’वर आक्षेपार्ह व्हिडिओ प्रसारित करून हिंदु धर्मियांच्या भावना दुखावल्या आहेत. या प्रकरणी कृष्णा ढेपे या तरुणाने श्रीरामपूर तालुका पोलिसात तक्रार दिली आहे. शेख याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. हिंदु धर्म बांधवांनी या कृत्याचा निषेध म्हणून १९ ऑगस्ट या दिवशी बेलापूर येथे कडकडीत बंद पाळला. या बंदला बेलापूर ग्रामस्थ आणि व्यापारी वर्गाने स्वयंस्फूर्तीने उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन गाव कडकडीत बंद ठेवले होते. या बंदला अनेक हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी पाठिंबा दिला आहे. या वेळी कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये; म्हणून पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
संपादकीय भूमिका :हिंदु सहिष्णू असल्यामुळे वारंवार हिंदूंच्या श्रद्धास्थानांचा, देवतांचा अवमान केला जातो, हे थांबले पाहिजे. पाकिस्तानमध्ये अल्ला, पैगंबर, कुराण आदींचा अवमान करणार्यांना फाशीची शिक्षा दिली जाते. तशी शिक्षा आता भारतातही हिंदु धर्माच्या संदर्भात करण्याचा कायदा करावा, असेच हिंदूंना वाटते ! |