(म्हणे) ‘मुसलमानांवर अत्याचार होत असलेल्या स्वातंत्र्यावर आम्ही लाथ मारतो !’-मौलाना अब्दुर्रहमान जामई याचे विधान !
हरदोई (उत्तरप्रदेश) येथे स्वातंत्र्यदिनी मदरशातील भाषणात मौलाना अब्दुर्रहमान जामई याचे विधान !
हरदोई (उत्तरप्रदेश) – जिल्ह्याच्या गोपामऊ येथील लाल पीर मशिदीत असणार्या मदरशात १५ ऑगस्टला स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. त्या वेळी मौलाना अब्दुर्रहमान जामई (मौलाना म्हणजे इस्लामचा अभ्यासक) याने केलेले भाषण सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहे. यात मौलाना म्हणतो, ‘ज्या स्वातंत्र्यामध्ये मुसलमानांवर अत्याचार होतात, असे स्वातंत्र्य आम्हाला नको. आम्ही त्याच्यावर लाथ मारतो.’ याविषयी पोलीस अधीक्षकांनी सांगितले की, या व्हिडिओचे अन्वेषण करून मौलानावर कारवाई केली जाईल.
#Hardoi
“ऐसी आजादी पर हम कल भी लात मारते थे आज भी लात मारते हैं”◆ मौलाना अब्दुर्रहमान जामई ने 15 अगस्त के दिन दिया बयान #UttarPradesh #TIME8 pic.twitter.com/weGT2CRogO
— TIME8 (@TIME8News) August 18, 2023
(म्हणे) ‘आम्हाला धार्मिक स्वातंत्र्य हवे आहे !’
भाषणात मौलाना जामई पुढे म्हणतो की, मशिदींवर लावण्यात आलेल्या भोंग्यांवरून अजान ऐकवल्यावरून गुन्हे नोंदवले जात आहेत. ‘मुस्लिम पर्सनल लॉ’ पालटण्याचा प्रयत्न केला जात आहे. ही कसली लोकशाही आहे ? हे कसले स्वातंत्र्य आहे ? ही तर मुसलमानांच्या धार्मिक प्रकरणात घुसखोरी केली जात आहे. आम्हाला धार्मिक स्वातंत्र्य हवे आहे. (धर्मनिरपेक्ष भारतात मुसलमानांना जितके धार्मिक स्वातंत्र्य आहे, तितके बहुसंख्य हिंदूंनाही नाही, तरीही यांचे समाधान होत नाही, हे लक्षात घ्या ! – संपादक)
संपादकीय भूमिका
|