रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमाला भेट दिल्‍यावर मान्‍यवरांनी दिलेले अभिप्राय !

१. कर्नल आर्.एस्.एन्. सिंह (रक्षण विशेषज्ञ), नवी देहली

अ. ‘आश्रम पाहून अत्‍यंत सुखद वाटले.
आ. मी आध्‍यात्मिक तरंगांचा प्रवाह अनुभवला.
इ. येथे भगवंत आपल्‍या अगदी जवळ असल्‍याचे अनुभवले.
ई. रामनाथी आश्रमात हिंदु राष्‍ट्राचे प्रतिरूप पाहिले.
उ. सनातन नित्‍य निरंतर असल्‍याची जाणीव झाली.’

२. श्री. अजय कुमार साहू (अखिल विश्‍व गायत्री परिवार), बिलासपूर

अ. ‘रामनाथी आश्रम पाहून वाटले, ‘प्रत्‍येक मंदिर या आश्रमासारखे व्‍हावे.’
आ. दर्शनार्थी आणि साधक यांना धर्मज्ञान देण्‍यासाठी हा आश्रम एक आदर्श आहे.
इ. साधकांचा आपलेपणा, समर्पण आणि मार्गदर्शन (Guidance) उल्लेखनीय आहे.’

३. अधिवक्‍ता आशुतोष कुमार शुक्‍ला (उच्‍च न्‍यायालय), वसुंधरा, गाझियाबाद, उत्तरप्रदेश.

अ. ‘आश्रम पाहून अत्‍यंत सुखद आणि ऊर्जेने परिपूर्ण अशी अनुभूती आली.
आ. काही ठिकाणी दिव्‍यता आणि सकारात्‍मकता यांची वैयक्‍तिक अनुभूती आली.
इ. आश्रम पहाण्‍याचा अनुभव खरोखर अद़्‍भुत आहे.’

४. श्री. एस्.पी. सुरेश (हिंदु राष्‍ट्र सेना), देवनागिरी, कर्नाटक.

अ. ‘आश्रम पाहून चांगले वाटले.
आ. एवढा भव्‍य आश्रम मी दुसरीकडे कुठेच पाहिला नाही.’

५. श्री. रामनारायण मिश्र (आंतरराष्‍ट्रीय अध्‍यक्ष, अखिल विश्‍व सरयूपारीण ब्राह्मण महासभा), नागपूर

अ. ‘आश्रम पाहून अद़्‍भुत वाटले.
आ. परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांचे नियोजन पाहून मी भावविभोर झालो.’

६. श्री. कृष्‍ण गुर्जर (प्रांत सुरक्षा प्रमुख, बजरंग दल), हिसार, हरियाणा.

अ. ‘आश्रम पहातांना एक क्षणभरही ‘मी पृथ्‍वीवर आहे’, असे मला वाटले नाही. मी दुसर्‍याच कोणत्‍या तरी लोकात असल्‍याची अनुभूती मला येत होती.’

‘संगीत’ आणि ‘संशोधन’ या विषयांवरील PPT (Power Point Presentation (टीप) पाहून मान्‍यवरांनी दिलेले अभिप्राय

टीप – हे एक सॉफ्‍टवेअर (संगणकीय प्रणाली) असून यावर संबंधित विषयांची विविध वैशिष्‍ट्ये दाखवता येतात.

१. अधिवक्‍ता आशुतोष कुमार शुक्‍ला, उत्तरप्रदेश

अ. ‘संगीतातील संशोधनाची ही दिशा आणि उद्देश मला अगदीच नवीन अन् अद़्‍भुत वाटला.
आ. ‘सनातन धर्म खरोखरच वैज्ञानिक आहे’, हे मला आज समजले.’

२. श्री. अजय कुमार साहू, बिलासपूर

अ. ‘पी.पी.टी. पाहून ‘आमची सनातन ज्ञान-परंपरा किती अधिक वैज्ञानिक आणि कल्‍याणकारी आहे’, हे माझ्‍या लक्षात आले.’

३. श्री. रामनारायण मिश्र, नागपूर

अ. ‘अतिशय सुंदर ! कलेच्‍या माध्‍यमातून ईश्‍वराच्‍या पवित्रतेचे वैज्ञानिक विश्‍लेषण अतिशय सुंदर वाटले.’

(सर्व सूत्रांचा दिनांक २०.६.२०२३)

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार अधिवक्ता आणि धर्मप्रेमी यांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक