हिंदु जनजागृती समितीची स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ‘राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा मोहीम’ !
कोल्हापूर जिल्ह्यात धर्मप्रेमींच्या पुढाकाराने ठिकठिकाणी निवेदन सादर !
कोल्हापूर – स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाची होणारी विटंबना रोखण्यासाठी शाळा-महाविद्यालय आणि प्रशासन यांनी आवश्यक ती कारवाई करावी, या मागणीसाठी कोल्हापूर जिल्ह्यात धर्मप्रेमींच्या पुढाकाराने कळे, सिरसे, गडहिंग्लज, तसेच कर्नाटकातील पट्टणकुडी येथे अशा १३ ठिकाणी विविध शाळा, महाविद्यालय आणि ग्रामपंचायती यांमध्ये निवेदने देण्यात आली.
याचसमवेत जागृती होण्यासाठी हस्तपत्रकांचे वितरण आणि ठिकठिकाणी भीत्तीपत्रकेही लावण्यात आली.
सिरसे येथे निवेदन देण्यासाठी धर्मप्रेमी सर्वश्री प्रशांत पाटील, ओंकार पाटील, समर्थ पाटील, तर पट्टणकुडी (कर्नाटक) येथे धर्मप्रेमी सर्वश्री सम्मेद श्रीपण्णावर, चेतन भोई, विजय पुणेकर, आदित्य परीट, श्रीरंग पुणेकर, अवधूत तेली, शुभम काशीदकर, युवराज गायकवाड आणि विशाल पुणेकर उपस्थित होते. कळे येथे धर्मप्रेमी श्री. अक्षय बेलेकर आणि श्री. व्यंकटेश सूर्यवंशी उपस्थित होते.