लंडनमध्ये भारताचा स्वातंत्र्यदिन साजरा करणार्‍यांवर खलिस्तानवाद्यांकडून आक्रमण !

लंडन (ब्रिटन) – लंडनच्या साऊथहॉल भागात भारताचा स्वातंत्र्यदिन साजरा करणार्‍या भारतीय वंशांच्या नागरिकांवर चाकूद्वारे आक्रमण केल्याच्या प्रकरणी पोलिसांनी २ खलिस्तानवाद्यांना अटक केली. गुरप्रीत सिंह असे एकाचे नाव आहे, तर दुसर्‍याला जामिनावर सोडण्यात आले आहे. गुरप्रीत सिंह हा भारतीय नागरिक आहे. गुरप्रीत सिंह याला पोलीस कोठडीत देण्यात आली आहे.

या आक्रमणाचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे. यात दिसत आहे की, काही भारतीय हातात राष्ट्रध्वज घेऊन फेरी काढत आहेत. वाटेत गुरुद्वारा असणार्‍या ठिकाणी त्यांना खलिस्तानवाद्यांकडून विरोध करण्यात आला. त्या वेळी झालेल्या वादातून स्वातंत्र्यदिन साजरा करणार्‍यांवर आक्रमण करण्यात आले. या गुरुद्वाराच्या भिंतीवर खलिस्तानी आतंकवादी भिंद्रनवाले याचे छायाचित्र लावण्यात आले होते.

संपादकीय भूमिका

  • ब्रिटनमध्ये खलिस्तान्यांची वळवळ वाढत चालली असून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याऐवजी भारतीय वंशाचे पंतप्रधान ऋषी सुनक यांचे सरकार शेपूट घालून बसले आहे, हे त्यांना लज्जास्पद आहे !
  • भारतीय वंशांचे नागरिक विदेशात मोठ्या पदावर पोचले आणि त्याचा भारतियांना अभिमान वाटला, तरी अशा नागरिकांचा भारताला अन् भारतियांना विशेष लाभ होत नाही, असेच चित्र दिसते !