हिमाचल प्रदेशमध्ये मुसळधार पावसामुळे आतापर्यंत ३३० लोकांचा मृत्यू

  • भूस्खलनामुळे ९ सहस्र घरांना तडे

  • १० सहस्र कोटी रुपयांची हानी

नवी देहली – हिमाचल प्रदेशमध्ये मुसळधार पावसामुळे आतापर्यंत ९ सहस्रांहून अधिक घरांची हानी झाली आहे. त्यांना तडे गेले आहेत. ही घरे कोणत्याही क्षण कोसळू शकतात, अशी स्थिती निर्माण झाली आहे. राज्यात आतापर्यंत पावसामुळे ३३० जणांना मृत्यू झाला, तर ११ सहस्र लोक स्थलांतरित झाली आहेत. राज्यातील १२ पैकी ११ जिल्ह्यांमध्ये ८५७ रस्ते बंद आहेत. पूर आणि भूस्खलन यांमुळे राज्याची १० सहस्र कोटी रुपयांपेक्षा अधिक हानी झाल्याचे सांगितले जात आहे.

पंजाबमध्येही मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. फिरोजपूरमधील आरजी पूल कोसळल्याने १५ गावांचा संपर्क तुटला आहे. फिरोजपूरमधील ५० गावे पुराच्या तडाख्यात सापडली आहेत.