माझ्या पतीला कारागृहात विष देण्याचा प्रयत्न होऊ शकतो !
पाकचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांची पत्नी बुशरा बीबी यांचे पाकच्या पंजाब प्रांताच्या गृह सचिवांना पत्र !
इस्लामाबाद (पाकिस्तान) – माझे पती इम्रान खान यांना येथील कारागृहात विष दिले जाऊ शकते, अशी भीती पाकचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांची पत्नी बुशरा बीबी यांनी व्यक्त केली आहे. त्यांनी पंजाब सरकारच्या गृह सचिवांना पत्र लिहून इम्रान खान यांना घरचे जेवण पुरवण्याची अनुमती देण्याची मागणी केली आहे. तसेच अटकेत असलेले इम्रान खान यांना येथील कारागृहातून रावलपिंडी येथील कारागृहात स्थलांतरित करण्यात यावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे. कारागृह नियमांचा हवाला देत बुशरा यांनी ‘अटकेनंतर ४८ घंट्यांत इम्रान खान यांना सुविधा पुरवणे अपेक्षित असतांना आज १२ दिवसांनंतरही सुविधा देण्यात आलेल्या नाहीत’, असा आरोपही केला आहे.
बुशरा बीबी ने जताई इमरान खान की सुरक्षा को लेकर चिंता#ImranKhan #WorldNewshttps://t.co/EXrt52i3nM
— Zee News (@ZeeNews) August 19, 2023
बुशरा बीबी यांनी पत्रात असेही म्हटले आहे की, माझ्या पतीची २ वेळा हत्या करण्याचा प्रयत्न झाला आहे; मात्र या प्रकरणी अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.