चिपळूण एस्.टी. आगाराकडून महिलांसाठी विशेष सुविधा
अष्टविनायक दर्शन आणि मार्लेश्वर यांसाठी विशेष बस सेवा
चिपळूण – कोरोना महामारीच्या कालावधीत एस्.टी. वाहतूक कोलमडल्याने दुरावलेले प्रवासी पुन्हा एस्.टी. महामंडळाशी जोडले जावेत, यासाठी महामंडळाकडून विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत. राज्यशासनाने महिलांना एस्.टी. प्रवासात ५० टक्के सवलत दिल्यानंतर अनुमाने २० ते २५ टक्के उत्पन्न वाढण्यास साहाय्य झाले आहे, अशी माहिती आगार व्यवस्थापक रणजित राजेशिर्के यांनी दिली.
आगार व्यवस्थापक रणजित राजेशिर्के पुढे म्हणाले की,
१. आता महिलांनी गट आरक्षण (ग्रुप बुकिंग) केल्यास त्यांना ६५५ रुपयांत अष्टविनायक दर्शन घेण्याची सुविधा चिपळूण आगाराकडून देण्यात आली आहे.
२. श्रावणी सोमवारनिमित्ताने प्रवाशांना मार्लेश्वर दर्शनासमवेत तेथील पर्यटनाचा आनंद लुटता येणार आहे. सकाळी ८ वाजता बस चिपळूण आगारातून सुटणार आहे.
३.आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर १५० गाड्यांचे आरक्षण पूर्ण (बुकिंग फुल्ल) झाले आहे. गट आरक्षणाची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.
४. प्रवाशांनी या योजनांचा लाभ घ्यावा.