नूहं (हरियाणा) येथे ७ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करणार्या धर्मांधाला जन्मठेप
नूंह (हरियाणा) – येथे डिसेंबर २०१९ मध्ये एका ७ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याच्या प्रकरणी न्यायालयाने मुकीम उपाख्य मुक्की याला जन्मठेप आणि ७५ सहस्र रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे.
मृत मुलगी बकरींना चरण्यासाठी घेऊन गेली होती. सायंकाळी उशिरापर्यंत ती घरी न आल्याने तिचा शोध घेतला असता तिचा मृतदेह आढळून आला होता. पोलिसांनी या घटनेची चौकशी केल्यावर सीसीटीव्हीचे चित्रीकरण सापडले. त्यात आरोपी बकरी घेऊन जात असल्याचे दिसून आले. ही बकरी मृत मुलीची होती, हे तिच्या वडिलांनी ओळखल्यानंतर पोलिसांनी मुकीम याला कह्यात घेऊन त्याची चौकशी केली. त्यात त्याने सांगितले की, नशेसाठी तो बकरी चोरून घेऊन जात असतांना मुलीने विरोध केला. तेव्हा त्याने तिच्यावर बलात्कार करून तिला ठार मारले.
Haryana: Mukeen raped and murdered a 7-year-old girl in Nuh, sentenced to life in prison after a 3-year-long trial. Read detailshttps://t.co/nOjDgfDVMP
— OpIndia.com (@OpIndia_com) August 18, 2023
संपादकीय भूमिका
|