प्रवचनाला आलेल्‍या जिज्ञासूंनी प्रवचनातील विषयाकडे लक्ष द्यावे आणि साधकांनी त्‍यांच्‍या अनुभूतींकडे लक्ष द्यावे !

सर्व साधकांचा आधार असलेले सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

वर्ष १९९७ – ९८ मध्‍ये महाराष्‍ट्रातील अनेक जिल्‍ह्यांत परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या सार्वजनिक सभा झाल्‍या. या सभांमध्‍ये ते सभेच्‍या आरंभी पुढील सूत्र सांगत असत.

आधुनिक वैद्य (डॉ.) मंगलकुमार कुलकर्णी

‘आजच्‍या प्रवचनाला जे जिज्ञासू आले आहेत, त्‍यांनी ‘मी काय सांगतो ?’, याकडे लक्ष द्यावे. जे साधक आहेत, त्‍यांनी मी ‘शब्‍दांत काय सांगतो ?’, यापेक्षा ‘काही अनुभूती येतात का ? उदा. प्रकाश दिसणे, नाद ऐकू येणे’ इत्‍यादींकडे लक्ष द्यावे. शब्‍दातील ज्ञान (माहिती) मेंदूच्‍या पेशींमध्‍ये साठवले जाते. मेल्‍यानंतर मेंदूतील पेशी जाळल्‍या जातात आणि पुढील जन्‍मात परत आरंभ करावा लागतो. या जन्‍मातील अनुभूती मात्र जीवात्‍म्‍याला येत असल्‍याने पुढील जन्‍मात आपल्‍या समवेत येतात.’ – (परात्‍पर गुरु) डॉ. आठवले

(संग्राहक : आधुनिक वैद्य (डॉ.) मंगलकुमार कुलकर्णी, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (६.६.२०२३))