वाडा (जिल्हा पालघर) येथे नाल्यात लाखो मृत माशांचा खच !
७ वर्षांपूर्वी ४ म्हशींचा मृत्यू !
वाडा (जिल्हा पालघर) – येथील तालुक्यातील मुसारणे ग्रामपंचायतीच्या हद्दीतील नाल्यामध्ये लाखो मृत माशांचा खच पडला आहे. येथे असणार्या आस्थापनांकडून नाल्यात दूषित पाणी सोडले जाते. त्यामुळे पाण्यावर तेलकट तवंग दिसत आहे. या तवंगामुळे भातशेतीही नष्ट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
७ वर्षांपूर्वी येथे रासायनिक आस्थापनांमधून रसायनमिश्रीत पाणी सोडल्याने लाखो माशांचा मृत्यू झाला होता. गावकर्यांच्या म्हशीही येथील पाणी पीत असल्याने त्या वेळी ४ म्हशी मृत झाल्या होत्या. अशी आस्थापने बंद करण्याची मागणी गावकर्यांनी प्रदूषण महामंडळ आणि स्थानिक प्रशासन यांच्याकडे केली; पण त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. (आस्थापनांमधून सोडण्यात येणार्या रसायनमिश्रीत पाण्यावर नियंत्रण आणण्यासाठी प्रशासन कधी जागे होणार ? – संपादक)