अखंड भारत संकल्प दिवस म्हणजे वैभवशाली भारतनिर्मितीचा संकल्प ! – आकाश जाधव, बजरंग दल
मिरज – अखंड भारत संकल्प दिवस म्हणजे खंडप्राय देश एकत्र करून पुन्हा वैभवशाली भारत निर्माण करण्याचा संकल्प होय, असे प्रतिपादन बजरंग दलाचे जिल्हा संयोजक श्री. आकाश जाधव यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराज चौकात बजरंग दलाच्या वतीने अखंड भारत संकल्प दिवस साजरा करण्यात आला. त्या प्रसंगी ते बोलत होते. प्रारंभी भारतमातेचे पूजन करून आरती, तसेच ध्येयमंत्र आणि प्रेरणामंत्र म्हणण्यात आला. या प्रसंगी विविध संघटनांचे प्रतिनिधी, राष्ट्रप्रेमी, बजरंग दलाचे कार्यकर्ते उपस्थित होते.