पोलिसांच्या सतर्कतेमुळे २ अल्पवयीन युवतींच्या अपहरणाचा धर्मांधांनी केलेला प्रयत्न फसला !
चंदगड (जिल्हा कोल्हापूर) – चंदगड तालुक्यातील एका तालुक्यातील एक अल्पवयीन युवती सकाळी शाळेत जाते म्हणून गेली ती शाळेत पोचलीच नसल्याचे तिच्या पाल्यांच्या लक्षात आले. त्यामुळे तिच्या पालकांनी पोलीस ठाण्यात तशी तक्रार दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी लगेचच चार पथके सिद्ध करून शाळेत, मैत्रिणीकडे, तसेच अन्य ठिकाणी पडताळणी केली. पोलिसांना अधिक अन्वेषण करतांना आणखी एक युवती बेपत्ता असल्याचे कळाले. यानंतर पोलिसांनी तांत्रिक साधनांचा आधार घेत साहिल प्रबळकर आणि सकलेन शेख या दोघांना कह्यात घेतले. हे दोघे या २ अल्पवयीन युवतींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचे अपहरण करण्याच्या सिद्धतेत होते. पोलीस साहिल आणि सकलेन दोघांकडून अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहेत. (संदर्भ – दैनिक सकाळ)