‘लॅटेम एअरलाइन्स’च्या विमानात मुख्य वैमानिकाला हृदयविकाराचा झटका !
सॅन्टियागो (चिली) – दक्षिण अमेरिकेतील सर्वांत मोठे विमान आस्थापन असलेल्या ‘लॅटेम एअरलाइन्स’च्या एका विमानाच्या वैमानिकाला विमान हवेत असतांना हृदयविकाराचा झटका आला. या वेळी त्याच्या सहवैमानिकांनी परिस्थितीचा अंदाज घेत विमान जवळच्या विमानतळावर उतरवले. ५६ वर्षीय वैमानिक इवान एंडोर याला वाचवण्याचा पुष्कळ प्रयत्न करण्यात आला, परंतु दुर्दैवाने त्याचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले आहे.
LATAM Airlines Pilot Dies Mid Flight From ‘Medical Emergency’ https://t.co/5iw8KySajB #OAN
— One America News (@OANN) August 17, 2023