छतरपूरचे माजी जिल्हाधिकारी आणि जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना प्रत्येकी ७ दिवसांच्या कारावासाची शिक्षा
न्यायालयाचा अवमान केल्याचे प्रकरण !
जबलपूर (मध्यप्रदेश) – न्यायालयाचा अवमान केल्याच्या प्रकरणी मध्यप्रदेश उच्च न्यायालयाने छतरपूरचे माजी जिल्हाधिकारी शीलेंद्र सिंह आणि जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमर बहादुर सिंह यांना प्रत्येकी ७ दिवसांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. यासह प्रत्येकी ५० सहस्र रुपयांचा दंडही ठोठावला. गेल्या मासात न्यायालयाने त्यांना या प्रकरणात दोषी ठरवले होते.
*पैनी नज़र : सजा के बाद राहत*
*छतरपुर के पूर्व कलेक्टर शीलेंद्र सिंह व जिला पंचायत सीईओ अमर बहादुर सिंह को सजा सुनाए जाने के बाद हाई कोर्ट ने सेंटेंस को सस्पेंड करते हुए दोनों लोगों को जमानत दे दी*
*आखिर कैसे मिली जमानत?*https://t.co/QQelYGtJXb
— Jitendra Richhariya (@jeetendrarichha) August 18, 2023
न्यायमूर्ती जी.एस्. अहलुवालिया यांनी निकालात शीलेंद्र सिंह आणि अमर बहादुर सिंह यांना याचिकाकर्त्या तथा छतरपूर स्वच्छता अभियानाच्या समन्वयक रचना द्विवेदी यांच्या स्थानांतराच्या प्रकरणी न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याविषयी दोषी ठरवले होते.