नेहा उपाख्य मेहर हिने १२ हिंदु पुरुषांना प्रेमाच्या जाळ्यात ओढून अश्‍लील छायाचित्रे काढून फसवले !

  • धर्मांतर आणि सुंता करून निकाह करण्यासाठी आणला दबाव !

  • अश्‍लील छायाचित्रे प्रसारित करण्याचे भय दाखवून मोठी रक्कम घेतली !

नेहा उपाख्य मेहर – सेक्स रॅकेट

बेंगळुरू (कर्नाटक) – येथील नेहा उपाख्य मेहर आणि तिचे मुसलमान सहकारी यांनी १२ हिंदु पुरुषांना जाळ्यात ओढून त्यांच्यावर धर्मांतर, सुंता अन् विवाह करण्याचे षड्यंत्र आखले होते. एका पीडित अभियंत्याने याविषयी पोलिसांत तक्रार प्रविष्ट केल्यानंतर तिघांना अटक करण्यात आली, तर ‘मॉडेल’ असलेली मेहर फरार होती. बेंगळुरू पोलिसांना १६ ऑगस्ट या दिवशी तिला अटक केली

१. मूळची मुंबईची मेहर ही कथित ‘मॉडेल’ २० ते ५० वर्षे वयाच्या हिंदु पुरषांना टेलीग्रामच्या माध्यमातून प्रेमाच्या जाळ्यात ओढत असे. ती स्वत:ची ओळख ‘नेहा’ म्हणून करून देत असे.

२. पुढे ती त्यांच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी त्यांना बेंगळुरूतील जेपी नगर येथे असलेल्या स्वत:च्या घरी बोलवत असे. अल्प कपडे घातलेली मेहर पुरुषांना बलपूर्वक जवळ घेऊन त्यांच्याशी अश्‍लील हावभाव करत असे. त्या वेळी घरातच लपून बसलेले मेहरचे सहकारी या वेळी छायाचित्रे टिपून घेत.

३. त्यानंतर लगेच मेहर आणि तिचे सहकारी पीडित पुरुषांचा भ्रमणभाष हिस्कावून त्यातील त्याचे कुटुंबीय आणि मित्रमंडळी यांचे संपर्क क्रमांक स्वत:कडे घेत. येथून पुरुषांना धमकावणे चालू केले जाई.

४. ‘मेहर ही मुसलमान असून तिच्याशी तू ‘निकाह’ केला नाहीस, तर संबंधितांना तुझी अश्‍लील छायाचित्रे पाठवू. तसेच मेहर ही मुसलमान असल्याने तुला इस्लाम स्वीकारून सुंता करावी लागेल’, अशा प्रकारे पीडित पुरुषांवर त्याच वेळी दबाव आणला जात असे. या वेळी पीडित पुरुष स्वत:ची सुटका करून घेण्यासाठी त्यांना हवी ती रक्कम देत असत.

५. एका युवकाने या गटाचा पर्दाफाश केला. त्याने धाडस दाखवून पोलिसांत तक्रार प्रविष्ट केली. यावरून अब्दुल खादर, यासीन आणि अन्य एकाला पोलिसांना अटक केली. या प्रकरणी नदीम या आरोपीला शोधण्याचा प्रयत्न चालू आहे.

संपादकीय भूमिका

  • ‘भगवा लव्ह ट्रॅप’सारखी षड्यंत्रे रचून हिंदु पुरुष मुसलमान महिलांचे पती अथवा प्रियकर असल्यावरून त्यांच्यावर योजनाबद्ध आक्रमण करणारे धर्मांध मुसलमान आता अशा क्लृप्त्या योजून त्यांचे जीवन उद्ध्वस्त करण्यासाठीही षड्यंत्र रचत आहेत. उद्या लव्ह जिहादच्या विरोधात राष्ट्रव्यापी कायदा आला, तरी अशा प्रकरणांवर सरकार आळा कसा घालणार ?
  • हिंदु समाज साधनाविहीन झाल्याने रज-तमाच्या गर्तेत अडकत चालला आहे, हेच वारंवार घडणार्‍या अशा घटना दाखवून देत आहेत. त्यामुळे आता षड्यंत्रकारी जिहाद्यांपासून स्वत:चे रक्षण होण्यासाठी केवळ हिंदु महिलाच नव्हे, तर पुरुषांनीही साधना करणे अत्यंत आवश्यक आहे, हे जाणा !