भारताच्या इस्लामीकरणासाठीच लव्ह जिहादचे षड्यंत्र ! – आमदार नीतेश राणे, भाजप
मुंबई – राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या कारवाईत पकडलेल्या ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’च्या कार्यकर्त्यांकडे सापडलेल्या कागदपत्रांद्वारे वर्ष २०४७ पर्यंत भारताला इस्लामिक राष्ट्र बनवण्याचे षड्यंत्र उघड झाले आहे. भारताला इस्लामिक राष्ट्र बनवायचे असेल, तर मुसलमानांना त्यांच्या संख्येत वाढ करावी लागेल. ‘लव्ह जिहाद’चे षड्यंत्र त्यासाठीच आहे, असे वक्तव्य भाजपचे आमदार नीतेश राणे यांनी केले. १७ ऑगस्ट या दिवशी नीतेश राणे यांनी महाराष्ट्रातील युवकांशी ‘महाराष्ट्र, लव्ह जिहाद आणि हिंदुत्व’ या विषयावर ऑनलाईन संवाद साधला. या वेळी युवकांनी विचारलेल्या विविध प्रश्नांवर नीतेश राणे यांनी मतप्रदर्शन केले.
या वेळी आमदार नीतेश राणे म्हणाले,
१. ‘लव्ह जिहाद’ हा अतिशय गंभीर विषय आहे. जिहाद करण्यासाठी ते कोणत्याही टोकाला जातात. अशा प्रवृत्तींचा सामना करण्यासाठी ‘हिंदु’ म्हणून एकत्र येणे काळाची आवश्यकता आहे.
२. हिंदु युवतींना प्रेमाच्या जाळ्यात फसवण्यासाठी बाहेरच्या देशांतून पैसा येतो. यासाठी कोणत्या भागात कुणाकडे दायित्व असणार ?, हिंदु युवतींना फसवण्यासाठी कोणत्या प्रकारची दुचाकी आणि भ्रमणभाष देण्यात येणार ?, हेही ठरवण्यात येते.
३. या विरोधात हिंदू हे ‘हिंदु’ म्हणून एकत्र येत नाहीत, ही हिंदूंची शोकांतिका आहे. हिंदू जातींमध्ये विभागले गेले आहेत. मीही राजकीय आरक्षणासाठी लढलो आहे; पण आज ‘हिंदू’ म्हणून एकत्र येणे ही काळाची आवश्यकता आहे.
४. हिंदू वेळ असेल, तेव्हा मंदिरात जातात; परंतु मुसलमान नियमित नमाजपठण करतात. त्यांनी त्यांचे आयुष्य धर्मासाठी दिले आहे.
५. काही मुसलमान राष्ट्रवादीही आहेत; मात्र धर्मांधांचे भारताला कोणत्याही परिस्थितीत भारताला इस्लामिक राष्ट्र बनवण्याचे धोरण (अजेंडा) आहे. अशा धर्मांधांसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, पंतप्रधान नरेंद्र मोदी ही मोठी अडचण आहे.
६. पुरोगाम्यांच्या घरातील कुणी लव्ह जिहादला बळी पडले नसल्यामुळे ते ‘लव्ह जिहाद’ नसल्याच्या बोंबा मारत आहेत; परंतु ज्या बापाची मुलगी लव्ह जिहादला बळी पडली आहे, त्यांच्या वेदना मी प्रत्यक्ष पाहिल्या आहेत. विकास होत राहील; पण ‘हिंदू’ म्हणून जगू शकलो नाही, तर कोणत्या रस्त्यावरून चालतो ?, कोणते पाणी पितो ?, याला काय अर्थ आहे ?
७. गणेशोत्सवामध्ये भोंगे वाजवायचे असतील, तर त्यासाठी अनुमती घ्यावी लागते; परंतु मशिदींवर अनुमती न घेताही भोंगे वाजवले जातात. या विरोधात कारवाई करण्यासाठी गेल्यास मुसलमान संघटित होऊन भीतीचे वातावरण निर्माण करतात.
८. मुंबईतील अनेक भागांत बांगलादेशी, रोहिंग्या मुसलमान घुसले आहेत. त्यांच्याकडे आधारकार्ड, मतदान ओळखपत्र आहे. हे भारतीय आणि हिंदू यांच्या विरोधातील षड्यंत्र आहे.
९. कर्नाटकमधील भाजपची सत्ता गेल्यानंतर तेथील हिंदूंवर काय स्थिती ओढावली ?, हे आपण पाहिले. जेथे काँग्रेसची सत्ता आली, तेथे ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ बळकट झाली. भविष्यात काँग्रेसची सत्ता आली, तर भारताचे इस्लामीकरण होईल.
१०. मुसलमान तरुणांनी औरंगजेबाची चित्रे ‘स्टेटस’वर ठेवली. हे कुणाच्यातरी पाठिंब्याविना शक्य होत नाही. याविरोधात हिंदूंनी काढलेल्या मोर्च्यांना विरोध करण्यात आला. हिंदूंना विरोध करून त्यावर हिंदूंची प्रतिक्रिया काय आहे ? याची चाचपणी घेतली जाते.
११. उगाच आणायचा म्हणून कायदा आणला, तर त्यातून पळवाटा निर्माण होतील. कायद्यामुळे लव्ह जिहादला बळी ठरलेली मुलगी आई-वडिलांकडे सुखरूप यायला हवी. लव्ह जिहाद आणि धर्मांतर या विरोधात आम्ही परिणामकारक कायदा आणणार आहोत.
हिंदूंच्या नेत्यांनी हिंदूंसाठी उभे रहायला हवे !मुसलमान गुन्हे करतात; कारण त्यांचे पुढारी त्यांच्यासाठी उभे रहातात. हिंदूंच्या नेत्यांनी हिंदूंसाठी उभे रहायला हवे. हिंदू एकत्र येत नाहीत, तोपर्यंत प्रश्न सुटणार नाहीत. जेथे आहोत, तेथे हिंदू म्हणून लढायला शिका. |