काँग्रेसेचे नेते आचार्य प्रमोद कृष्णम यांना श्री कल्कि मंदिर बांधण्यास न्यायालयाची अनुमती !
मुसलमानांच्या तक्रारीनंतर जिल्हाधिकार्यांनी बांधकामास दिली होती स्थगिती
संभल (उत्तरप्रदेश) – अलाहाबाद उच्च न्यायालयाने काँग्रेसेचे नेते आचार्य प्रमोद कृष्णम यांना त्यांच्या संभलमधील खाजगी जागेत श्री कल्कि मंदिर बांधण्यास नुकतीच अनुमती दिली. अशा बांधकामामुळे इतर समुदायाच्या धार्मिक भावना दुखावल्या जाऊ शकत नाहीत. एका मुसलमान नेत्याने आक्षेप घेतल्यानंतर संभल येथील जिल्हा दंडाधिकार्यांनी मंदिराचे बांधकाम थांबवण्याचा आदेश दिला होता. परिसरातील धार्मिक शांतता आणि सार्वजनिक सुव्यवस्था बिघडू शकते, असे सांगत जिल्हा दंडाधिकार्यांनी मंदिराच्या बांधकामाला स्थगिती दिली होती.
उत्तर प्रदेश के संभल में कल्कि धाम मंदिर के निर्माण का रास्ता साफ हो गया है। इलाहाबाद हाई कोर्ट ने निर्माण पर लगी रोक को असंवैधानिक बताया है।#KalkITemple #HighCourt #UttarPradesh https://t.co/ZG5DZngzYf
— ऑपइंडिया (@OpIndia_in) August 18, 2023
१. आचार्य प्रमोद कृष्णम यांनी २०१६ मध्ये संभल जिल्ह्यातील अचोरा कंबो गावात श्री कल्कि धाम मंदिर बांधण्यासाठी भूमी खरेदी केली होती. मुसलमान किसान युनियनचे राष्ट्रीय अध्यक्ष इमामुर रहमान खान यांनी, ‘या परिसरातील मुसलमानांना मंदिर होऊ द्यायचे नाही’, असा दावा करत त्यावर आक्षेप घेतला होता. (हिंदूंच्या भूमीवर अतिक्रमण करणारे, हिंदूंच्या मंदिरांची तोडफोड करणार्या धर्मांधांना हिंदूंनी त्यांच्या भूमीत मंदिर बांधल्यावर पोटशूळ उठतो, हे लक्षात घ्या ! – संपादक) त्यांनी या प्रकरणी जिल्हा दंडाधिकार्यांकडे तक्रार प्रविष्ट केली होती.
सत्य “सार्थक”
सर्वदा-सत्य मेव जयते. #श्रीकल्किधाम pic.twitter.com/PXaEDl82lz— Acharya Pramod (@AcharyaPramodk) August 17, 2023
२. जिल्हा दंडाधिकार्यांच्या आदेशाच्या विरोधात आचार्य प्रमोद कृष्णम यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयात धाव घेतली होती. अलाहाबाद उच्च न्यायालयाने या प्रकरणी निकाल देतांना सांगितले की, खासगी भूमीवर मंदिर बांधण्याचा अधिकार भारतीय राज्यघटनेच्या २५ आणि २६ कलमांनुसार संरक्षित आहे आणि ‘या बांधकामामुळे कायदा आणि सुव्यवस्था बिघडली’, असा कोणताही पुरावा उपलब्ध नाही.
संपादकीय भूमिकामुसलमानांची खरी मानसिकता काँग्रेसवाल्यांना आता तरी कळेल का ? |