‘हिंदु’ शब्दाचा उल्लेख केल्यावरून शिक्षणाधिकार्याची मुख्याध्यापकांना समज !
|
उडुपी (कर्नाटक) – जिल्ह्यातील मूडबिद्रे येथे वरिष्ठ प्राथमिक सरकारी शाळेमध्ये स्वातंत्र्यदिनी आयोजित कार्यक्रमामध्ये हिंदु जनजागृती समितीने सहभाग घेतला होता. या वेळी व्यासपिठावर माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष आणि समुपदेशक अब्दुल करीम उपस्थित होते. या प्रसंगी कार्यक्रमाला उपस्थित समितीच्या सौ. अलका बलराम आणि सौ. शामला सुरेश यांचा परिचय करून देतांना ‘हिंदु जागरण वेदिके’च्या कार्यकर्त्या अशा प्रकारे करून देण्यात आला. या वेळी समुपदेशक अब्दुल करीम रागावून उठून बाहेर निघून गेले. त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्नही अपयशी ठरला. कार्यक्रम संपण्याआधीच नगरपालिकेच्या शिक्षण विभागाकडे तक्रार करण्यात आली. शिक्षणाधिकार्यांनी शाळेच्या मुख्याध्यापकांना बोलावून घेऊन ‘समितीच्या कार्यकर्तींचे केवळ नाव घ्यायला हवे होते. ‘हिंदु’ शब्दाचा उल्लेख करायला नको होता’, अशा प्रकारे त्यांना समज दिली. हा विषय शाळा मुख्याध्यापकांनी समितीच्या कार्यकर्तींना बोलावून सांगितला. ‘या प्रकरणी पुढे बोलावल्यास तुम्हाला उपस्थित रहावे लागेल’, असेही मुख्याध्यापकांनी त्यांना सांगितले.
जिल्ह्यातील मूडबिद्रे येथे वरिष्ठ प्राथमिक सरकारी शाळेमध्ये राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्याच्या निमित्ताने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले होते. या वेळी समितीच्या कार्यकर्तींना व्याख्यान घेण्याची अनुमती देण्यात आली. त्यामुळे स्वातंत्र्यदिनी त्या शाळेत उपस्थित झाल्या. या प्रसंगी ध्वजारोहणाच्या आधी लहानशी सभा भरवण्यात आली. या वेळी मुख्याध्यापकांनी समितीच्या सौ. अलका बलराम आणि सौ. शामला सुरेश यांची ओळख करून देतांना वरील घटना घडली.
संपादकीय भूमिका
|