श्रीरामजन्मभूमी मुक्ती आंदोलनात प्राणत्याग करणार्‍यांचा सन्मान करण्याची मागणी !

श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाकडे प्रस्ताव !

अयोध्या (उत्तरप्रदेश) – येथील श्रीरामजन्मभूमीवर बांधण्यात येत असलेल्या भव्य श्रीराममंदिराचे काम युद्धपातळीवर चालू आहे. या मंदिरासाठी ५०० वर्षे हिंदूंकडून आंदोलन करण्यात येत होते. यात सहस्रो हिंदूंनी प्राणांचा त्याग केला. या रामभक्तांचा योग्य सन्मान करण्याचा प्रस्ताव श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासासमोर ठेवण्यात आला आहे. यात अशा रामभक्तांचे पुतळे ठिकठिकाणी उभारणे, येथील चौक आणि रस्ते यांनी त्यांची नावे देणे, अशा प्रकारची मागणी करण्यात आली आहे.  या प्रस्तावावर चर्चा करण्यात येत आहे.

श्रीरामजन्मभूमीच्या आंदोलनात सहस्रो लोकांनी बलीदान दिले असल्याने आणि त्यांची माहितीही मिळणे कठीण असल्याने त्यांचे पुतळे उभारणे शक्य होणार नाही, असे सूत्र उपस्थित करण्यात आले आहे. श्रीराममंदिर उभारण्यासाठी बलीदान दिलेल्यांची अगदी अचूक माहिती आहे, त्यांना आंदोलनाविषयीचे संग्रहालय बनवून त्यात स्थान दिले जाऊ शकते, असाही प्रस्ताव न्यासाकडे आला आहे.