एकतर्फी प्रेमातून येरवडा (पुणे) कारागृहातील महिला शिपायाला पेटवून देण्याचा प्रयत्न !
वरिष्ठ कारागृह अधिकार्याला अटक !
पुणे – प्रेमसंबंध ठेवण्यास नकार दिल्याने आणि बलात्काराचा गुन्हा मागे घेत नसल्याने येरवडा कारागृहातील ३९ वर्षीय महिला शिपायाच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला पेटवून देण्याचा प्रयत्न वरिष्ठ कारागृह अधिकारी योगेश पाटील (रा. कोल्हापूर) यांनी केला.
कोल्हापूर कारागृहात असतांना आरोपी पाटील आणि तक्रारदार यांची ओळख होऊन प्रेमात रूपांतर झाले होते. आरोपी १४ ऑगस्ट या दिवशी तक्रारदाराच्या घरी गेला. ‘मी तुझ्याविना जगू शकत नाही. तू माझी झाली नाहीस, तर मी तुला कुणाचीही होऊ देणार नाही’, असे म्हणत तिच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला पेटवून देण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी महिला आरोपीला धक्का देऊन आतील खोलीत लपून बसल्याने अनर्थ टळला. येरवडा पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेत आरोपी पाटील यांना अटक केली आहे.
संपादकीय भूमिका :
|