२५ वर्षे सुविद्य आणि सुसंस्कृत समाज घडवण्याचे कार्य दमदारपणे करणारे ‘सनातन प्रभात’ ! – दुर्गेश परुळकर, प्रसिद्ध व्याख्याते, मुंबई.
साप्ताहिक ‘सनातन प्रभात’च्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने मान्यवरांची प्रतिक्रिया
‘सनातन प्रभात’ हे अत्यंत महत्त्वाचे नियतकालिक आहे. ते अबालवृद्धांना मार्गदर्शन करते. अशा प्रकारचे अन्य नियतकालिक आपल्याला आढळत नाही. राजकीय दृष्टी देणारे, सांस्कृतिक आणि धार्मिक मार्गदर्शन करण्याचे व्रत ‘सनातन प्रभात’ने घेतले आहे. साधना, नामजप यांचे महत्त्व सांगणारे आणि त्यासाठी प्रेरणा देणारे आहे. ‘सनातन प्रभात’ हिंदु समाजाला आपल्या धार्मिक आणि सांस्कृतिक कार्याची जाणीव करून देते. अशा प्रकारे सुविद्य आणि सुसंस्कृत समाज घडवण्याचे कार्य गेली २५ वर्षे दमदारपणे करत आहे. त्याबद्दल सनातन प्रभातचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा !