हवी मज केवळ तुझी कृपाछाया ।
‘माझे मन अस्थिर होऊन नकारात्मक स्थितीत जाते, तेव्हा त्या स्थितीतून बाहेर पडण्यासाठी गुरुदेवांना (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना) प्रार्थना करतांना सुचलेल्या ओळी येथे दिल्या आहेत.
मी असमर्थ, करीते विनवणी ।
देवा (टीप), याचक भावे तुमच्या चरणी ।
मन माझे हे लागो सेवेकारणी ॥ १ ॥
देवा, किती सांगू तुला माझ्या व्यथा ।
तूच आहेस या अनाथ जिवाचा, नाथा ।
शरणागत मी, तव चरणी ठेवते माथा ॥ २ ॥
टाक सारे पालटूनी अंतरी येऊन माझ्या ।
नको मज आता ही अंतरीची माया ।
हवी मज केवळ तुझी कृपाछाया’ ॥ ३ ॥
टीप : सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
– सौ. स्वाती संदीप शिंदे (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय ३५ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१५.१०.२०२२)