ऐन पावसाळ्‍यात मराठवाड्यातील धरणांत केवळ ४२.७९ टक्‍के पाणीसाठा !

छत्रपती संभाजीनगर – पावसाने दडी मारल्‍याने मराठवाड्याची चिंता वाढली आहे. विभागात यावर्षी आजपर्यंत ३३६ मि.मी. पाऊस झाला असून गतवर्षी आजच्‍या दिनांकाला ५२८ मि.मी. पाऊस झाल्‍याची नोंद करण्‍यात आली होती, तसेच गेल्‍या वर्षी आजच्‍या दिनांकात मराठवाड्यातील ११ मोठ्या धरणांत एकूण ८६.६७ टक्‍के पाणीसाठा होता; मात्र यंदा ऐन पावसाळ्‍यात याच धरणांमध्‍ये ४२.७९ टक्‍के पाणीसाठा आहे. गेल्‍या वर्षीच्‍या तुलनेत ४३.८८ टक्‍के पाणीसाठ्याची घट झाली आहे. याचा परिणाम जाणवत असून संभाजीनगर आणि जालना येथे ८४ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.