हरियाणा पोलिसांचा हिंदुद्वेष :‘त्रिशूळ’ला संबोधले ‘प्राणघातक शस्त्र !’
|
नूंह (हरियाणा) – येथे धर्मांध मुसलमानांनी ३१ जुलै या दिवशी हिंदूंच्या ब्रजमंडल जलाभिषेक यात्रेवर आक्रमण करून मोठ्या प्रमाणात जाळपोळ केली होती. या वेळी काही हिंदू आणि गृहरक्षक दलाच्या दोन कर्मचार्यांना ठार मारण्यात आले होते. या प्रकरणी धर्मांध मुसलमानांनी ‘गोरक्षक बिट्टू बजरंगी यांनी फेसबुकवरून मुसलमानांना चिथावणी दिल्याने हिंसाचार झाला’, अशी आवई उठवली. त्यामुळे पोलिसांनी बजरंगी यांना १६ ऑगस्ट या दिवशी अटक करून न्यायालयासमोर उपस्थित केले.
नूंह: हाथ में त्रिशूल-तलवार… बिट्टू बजरंगी ने ऐसा मचाया था तांडव #NuhConspiracy | #NuhViolence | #BittuBajrangi @puneetauthor https://t.co/WxSWTSXXRx
— TV9 Bharatvarsh (@TV9Bharatvarsh) August 16, 2023
बजरंगी यांच्या विरोधातील प्रथम खबरी अहवालात नमूद करण्यात आले आहे की, यात्रेमध्ये शस्त्र बाळगण्याची अनुमती नसतांनाही बिट्टू बजरंगी आणि अन्य १५ ते २० जणांनी ‘त्रिशूळ’ आणि ‘तलवार’ यांच्यासारखी ‘प्राणघातक शस्त्रे’ बाळगली. पोलिसांनी ही शस्त्रे हिंदूंकडून काढून घेतल्यानंतरही बजरंगी आणि त्यांच्या साथीदारांनी पोलिसांच्या गाडीतून ती बलपूर्वक काढून घेतली. या वेळी उपस्थित पोलिसांशी त्यांचा वादही झाला. यावरून बिट्टू बजरंगी यांच्याविरोधात विविध कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आला.
संपादकीय भूमिका
|