उपाहारगृहांतील अन्नाच्या नमुन्यांच्या पडताळणीतून गंभीर प्रकार उघड झाल्यास ‘मकोका’ कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवू ! – मंत्री धर्मरावबाबा आत्राम
अन्न आणि औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांची चेतावणी
वांद्रे – येथील ढाब्यामध्ये चिकनच्या ताटलीत मृत उंदीर आढळला. यानंतर अन्न आणि औषध प्रशासन विभागाने मुंबईतील उपाहारगृहांमध्ये तपास करण्यास प्रारंभ केला आहे. ‘प्रत्येक अधिकार्याला त्याच्या क्षेत्रातील ५ उपाहारगृहांची पडताळणी करावी, असा आदेश दिला आहे. नमुन्यांच्या पडताळणीचे अहवाल आल्यावर कारवाई केली जाईल आणि गंभीर प्रकार समोर आल्यास ‘मकोका’ कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात येईल, अशी चेतावणी अन्न आणि औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी दिली आहे.
किळसवाणा प्रकार! ढाब्यावरील जेवणात आढळला मेलेला उंदीर; नेटकऱ्यांकडून संताप व्यक्त#Viral #trending #Rat #Food #Punjabhttps://t.co/1ZpOe47j0H
— ABP माझा (@abpmajhatv) July 9, 2023
‘असे प्रकार वारंवार होत राहिल्यास संबंधित हॉटेल्सचा परवानाही रहित करण्यात येईल’, अशी चेतावणीही त्यांनी दिली.