न्यायालयात महिलांविषयी वापरण्यात येणार्‍या आक्षेपार्ह शब्दांवर सर्वोच्च न्यायालयाकडून बंदी

नवी देहली –  न्यायालयात महिलांविषयी वापरण्यात येणार्‍या आक्षेपार्ह शब्दांवर सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातली. महिलांना मान देण्याच्या दृष्टीकोनातून सर्वोच्च न्यायालयाने ‘न्यायालयातील युक्तिवाद आणि निर्णय यांत ‘वेश्या’, ‘मालकीण’ यांसारखे शब्द वापरू नयेत’, असे म्हटले आहे.

यासाठी भारताचे सरन्यायाधीश डी.व्हाय. चंद्रचूड यांनी १६ ऑगस्ट २०२३ या दिवशी या नवीन शब्द आणि वाक्य यांसह ‘जेंडर स्टिरियोटाइप कॉम्बॅट’ ही पुस्तिका प्रकाशित केली. न्यायाधीश आणि अधिवक्ता यांच्यासाठी ही पुस्तिका उपयुक्त असल्याचे सरन्यायाधिशांनी सांगितले.