पोलीस अन्वेषण योग्य दिशेने होत असून न्याययंत्रणेवर विश्वास ठेवा ! – ‘स्वराज्य गोमंतक’चे आवाहन
म्हापसा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना केल्याचे प्रकरण
म्हापसा, १६ ऑगस्ट (वार्ता.) – करासवाडा, म्हापसा येथे सिंहासनाधिष्ठित छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची १३ ऑगस्ट या दिवशी अज्ञातांनी तोडफोड करून विटंबना केली. या प्रकरणी म्हापसा पोलिसांनी म्हापसा येथील नागरिक तथा संशयित नायजल फोन्सेका, आलेक्स फर्नांडिस आणि लॉरेन्स मेंडिस यांना कह्यात घेतले आहे.
(सौजन्य : prudent media)
या प्रकरणी चालू असलेल्या अन्वेषणाविषयी माहिती जाणून घेण्यासाठी ‘स्वराज्य गोमंतक’ संघटनेच्या शिष्टमंडळाने १६ ऑगस्ट या दिवशी म्हापसा पोलिसांची भेट घेतली.
म्हापसा ग्रामस्थ आणि स्वराज्य गोमंतक यांच्या संयुक्त विद्यमाने त्वरित छत्रपती शिवाजी महाराजांचा नवीन पुतळा बसवला गेला !
(सौजन्य : goan reporter)
भेटीनंतर पत्रकारांशी बोलतांना ‘स्वराज्य गोमंतक’ संघटनेचे सदस्य म्हणाले, ‘‘छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना केल्याच्या प्रकरणी पोलिसांचे अन्वेषण योग्य दिशेने चालू आहे. पोलीस करत असलेल्या अन्वेषणावर आम्ही समाधानी आहोत. नागरिकांनी पोलीस यंत्रणा आणि न्यायव्यवस्था यांच्यावर विश्वास ठेवून राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवावी.’’