किती वेळा ग्रंथ वाचले याला महत्त्व नाही, तर त्यातील किती ओळी जीवनात अंगीकारता हे महत्त्वाचे !
‘किती ग्रंथ वाचले, किती वेळा वाचले, याचे अधिक महत्त्व नाही. कित्येक लोक बोलतात की, ‘आम्ही ६ वेळा योगवाशिष्ठ वाचले’; परंतु त्यांना योगवाशिष्ठामधील काही विचाराल, तर एक ओळही ठाऊक नाही !… भलेही एक उतारा (पॅराग्राफ) वाचा किंवा फारतर ४ ओळीच वाचा; पण वाचलेल्या वचनांचे चिंतन-मनन करून त्यांना जीवनात अंगीकारण्याचा प्रयत्न करा. एक ओळ जरी तुम्ही जीवनात अंगीकारली, तरी ते वाचन सार्थक होईल.’
(साभार : मासिक ‘ऋषी प्रसाद’, जुलै २०२०)