पंतप्रधानांच्या विरोधात घोषणा दिल्यानेे ‘भारत मुक्ती मोर्चा’च्या १५० जणांवर गुन्हा नोंद !
पुणे – पंतप्रधान नरेंद्र मोदी, तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प.पू. सरसंघचालक मोहन भागवत यांच्याविषयी असभ्य भाषेत घोषणा दिल्याच्या प्रकरणी ‘भारत मुक्ती मोर्चा’च्या अध्यक्षांसह १५० जणांविरोधात पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. भारतीय जनता पक्षाचे युवा मोर्चाचे कसबा विधानसभाचे अध्यक्ष अमित कंक यांनी फरासखाना पोलीस ठाण्यामध्ये तक्रार प्रविष्ट केली. भारत मुक्ती मोर्चाकडून या वेळी शिवाजी रस्त्यावर फेरी काढली. ध्वनीवर्धकावरून फेरीमध्ये सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी शिवीगाळ केल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर कंक यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलीस निरीक्षक अनिता हिवरकर या पुढील अन्वेषण करत आहेत.