अल्पवयीन हिंदु मुलीला बुरखा घालून नेणार्या मुसलमानाला हिंदुत्वनिष्ठांनी चोपले !
वांद्रे टर्मिनस (मुंबई) येथे ‘लव्ह जिहाद’चा प्रकार उघड !
मुंबई, १६ ऑगस्ट (वार्ता.) – वांद्रे टर्मिनस येथे अल्पवयीन हिंदु युवतीला बुरखा घालून समवेत नेणार्या मुसलमान युवकाला हिंदुत्वनिष्ठांनी चोप दिला. हा व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर प्रसारित झाला आहे. ‘नेमका काय प्रकार घडला’, याविषयीची माहिती समोर आलेली नाही; मात्र अल्पवयीन हिंदु मुलीला बुरखा घालण्याच्या प्रकारातून यामध्ये ‘लव्ह जिहाद’ आणि त्यातून ‘धर्मांतर’ याविषयी संशय व्यक्त केला जात आहे.
या व्हिडिओमध्ये हिंदुत्वनिष्ठ युवक मुसलमान युवकाला पकडून वांद्रे टर्मिनसच्या बाहेर आणत असल्याचे दिसत आहे. या वेळी ‘जय श्रीराम’च्या घोषणा देत, ‘लव्ह जिहाद बंद करा’, अशा अशा घोषणा त्यांनी दिल्या आहेत. यांतील एका हिंदुत्वनिष्ठ युवकाने ‘आज वांद्रे टर्मिनस येथे एका अल्पवयीन हिंदु मुलीला आम्ही ‘लव्ह जिहाद’पासून वाचवले आहे’, असे म्हटले आहे.
(म्हणे) ‘लव्ह जिहादच्या नावाने हिंदुत्वनिष्ठ गुंडांनी अमानुष मारहाण केली !’ – वारिस पठाण, माजी आमदार, एम्.आय.एम्.
‘एम्.आय.एम्.’चे माजी आमदार वारिस पठाण यांनी हा व्हिडिओ त्यांच्या ‘ट्वीट’वरून प्रसारित केला आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, वांद्रे रेल्वेस्थानकावर एका मुसलमान मुलाला लव्ह जिहादच्या नावाने हिंदुत्वनिष्ठ गुंडांनी अमानुषपणे मारहाण केली. आज आपण स्वातंत्र्याचे ७७ वे वर्ष साजरे करत आहोत. आपल्या हुताम्यांनी कधी विचार केला नव्हता की, मुसलमानांना हा दिवस पहावा लागेल. मुंबई पोलिसांनी या घटनेची त्वरित माहिती घ्यावी आणि जे गुंड यामध्ये सहभागी आहेत, त्यांना त्वरित अटक करून कठोरात कठोर शिक्षा द्यावी. तसे झाल्यास भविष्यात कुणी असे करण्यापूर्वी १०० वेळा विचार करील. ही घटना २१ किंवा २२ जुलै या दिवशी घडली आहे; मात्र याविषयीचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांवरून आता प्रसारित झाला आहे. (हिंदुत्वनिष्ठांना ‘गुंड’ म्हणणारे पठाण यांना स्वत:चे धर्मबांधव हिंदु युवतींना प्रेमाच्या जाळ्यात फसवून त्यांचे धर्मांतर करतात, ते का दिसत नाही ? लव्ह जिहाद करणार्याला चोप दिला, तर कायदा आणि सुव्यवस्था यांचा प्रश्न निर्माण होत असेल, तर लव्ह जिहादमध्ये हिंदु युवतींना फसवून, त्यांचे धर्मांतर केले जाते, तेव्हा हा प्रश्न निर्माण होत नाही का ? सोयीनुसार भूमिका घेणार्या वारिस पठाण यांनी ‘लव्ह जिहाद’ करणार्या स्वत:च्या धर्मबांधवांना रोखल्यास अशा घटना घडणार नाहीत ! – संपादक)
बांद्रा स्टेशन पर एक निहतते मुस्लिम लड़के को लव जिहाद के नाम पर हिन्दुत्ववादी गुंडों द्वारा बेरहमी से पीटा गया !
हम आज यौमे आज़ादी का ७७ साल मना रहे है !
हमारे शहीदों ने कभी सोचा नहीं था की मुसलमानों को ये दिन भी देखना पड़ेगा।मुंबई पुलिस इस घटना का फ़ौरन संज्ञान ले और जो… pic.twitter.com/orSrNCGdHF
— Waris Pathan (@warispathan) August 15, 2023
संपादकीय भूमिकालव्ह जिहादच्या घटना दिवसेंदिवस वाढत असूनही त्या रोखण्यात यंत्रणा अपयशी ठरत आहेत. त्यामुळे भविष्यात हिंदूंचा उद्रेक झाल्यास त्याला उत्तरदायी कोण ? |