उत्पादन शुल्क विभागाने नोंदवलेल्या ५१ सहस्र ८०० गुन्ह्यांतील केवळ ६९९ गुन्हे सिद्ध !
मुंबई, १६ ऑगस्ट (वार्ता.) – उत्पादन शुल्क विभागाने वर्ष २०२२-२३ मध्ये ५१ सहस्र ८०० गुन्हे नोंदवले होते. यांतील केवळ ६९९ गुन्हे सिद्ध झाले आहेत. यामध्ये गुन्हे सिद्ध होण्याचे प्रमाण केवळ १.३४ टक्के इतकेच आहे. या एकूण गुन्हांपैकी केवळ २२ सहस्र ४६३ प्रकरणांत आरोपपत्र प्रविष्ट करण्यात आले आहे. आरोप सिद्ध होण्याचे हे प्रमाण अत्यंत निराशाजनक आहे.
वर्ष २०२२-२३ मध्ये एकूण ४३ सहस्र ६२५ आरोपींना अटक करण्यात आली; मात्र दोषारोप सिद्ध होण्याचे प्रमाण अत्यल्प असल्यामुळे हे आरोपी पुन्हा गुन्हे करण्यास मोकाट सुटतात. एप्रिल ते जून २०२३ या कालावधीत उत्पादन शुल्क विभागाद्वारे १३ सहस्र ४८७ गुन्हे नोंदवण्यात आले असून त्यामध्ये ११ सहस्र ५४८ आरोपींना अटक झाली आहे; मात्र यातून किती जणांच्या विरोधात आरोपपत्र प्रविष्ट करण्यात येणार आणि प्रत्यक्षात किती जणांना शिक्षा होणार, हा प्रश्नच आहे.
संपादकीय भूमिकागुन्हे सिद्धतेचे प्रमाण इतके अल्प असेल, तर गुन्हेगारांना धाक कसा बसणार ? |