पश्चिम चंपारण (बिहार) येथील ‘सीताराम शाळे’त मुसलमान युवकांनी फडकावला इस्लामचा ध्वज !
पाटलीपुत्र (बिहार) – राज्यातील पश्चिम चंपारण जिल्ह्यातील मझौलिया भागात ‘सीताराम शाळे’मध्ये भारतीय राष्ट्रध्वज फडकावण्यात आल्यावर काही मुसलमान युवकांनी इस्लामचा ध्वजही फडकावला. या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे.
15 अगस्त पर फहराया गया इस्लामिक झंडा..!
11वीं के छात्र शाहिद हसन ने साथियों के साथ लहराया इस्लामिक झंडा. बिहार के पश्चिमी चंपारण के गांव सरैया के “सीताराम हाईस्कूल” का मामला
आखिर ये कौन सी सोच है जिसे तिरंगे से इतनी नफरत है ?
| Indian Muslims | National Flag | pic.twitter.com/kqbOzLlUui
— Shivam Dixit (@ShivamdixitInd) August 15, 2023
१५ ऑगस्टच्या सकाळी शाळेत राष्ट्रध्वज फडकावण्यात आल्यावर काही मुसलमान युवक शाळेच्या परिसरात घुसले आणि त्यांनी इस्लामी ध्वज फडकावला. तसेच मुसलमान युवकांनी काही आक्षेपार्ह घोषणाही दिल्या. या वेळी शिक्षक आणि स्थानिक लोक यांनी त्यांना विरोध केला. पोलिसांना सूचना मिळताच ते घटनास्थळी पोचले; परंतु त्याआधी मुसलमान युवक तेथून पळून गेले होते. (अशा वेळी तेथील शिक्षक, स्थानिक लोक आणि विद्यार्थी यांनी बघ्याची भूमिका घेतली होती का ? हिंदूंच्या अशा नेभळट मानसिकतेमुळेच आज धर्मांध उद्दाम होत चालले आहेत, हे जाणा ! – संपादक) या वेळी त्या युवकांपैकी शाहिद हसन या अकरावीत इयत्तेत शिकणार्या युवकाला अटक करण्यात पोलिसांना यश आले. शाळेचे मुख्याध्यापक अशोक कुमार यांच्यावर आरोप होत आहेत की, ते मुसलमान युवकांच्या या कृत्याकडे दुर्लक्ष करून ते विद्यार्थ्यांना खाऊ देण्यात मग्न होते.
केरळमध्ये राष्ट्रध्वज फडकावला जात असतांना मशिदीच्या मौलवींमध्ये वाद !अन्य एका प्रकरणी केरळच्या कासारगोड जिल्ह्यातील ‘जमात मशीद समिती’च्या परिसरात राष्ट्रध्वज फडकावला जात असतांना तेथील मुसलमान नेत्यांमध्ये वाद झाला. यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान झाला. या घटनेचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांत प्रसारित होत आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवल्याची माहिती स्थानिक पत्रकारांनी दिली. |
संपादकीय भूमिका
|