माळीणमुळे विस्‍थापित झालेल्‍यांच्‍या घरांसाठी दिलेले ४३ लाख रुपये ठेकेदाराने हडपले !

नागरिकांना घरांऐवजी रहावे लागत आहे ‘पोल्‍ट्री फार्म’मध्‍ये !

मुरबाड – पुणे जिल्‍ह्यातील माळीण गाव डोंगराखाली गाडले गेल्‍यावर त्‍याच्‍या शेजारच्‍या साखरमाची गावाला ठाणे जिल्‍ह्यातील मुरबाडजवळ विस्‍थापित करण्‍यात आले. तेथे त्‍यांच्‍या घरांसाठी देण्‍यात आलेला ४३ लाख रुपयांचा निधी वनविभागाच्‍या ठेकेदाराने घेतला. घरांऐवजी त्‍यांना पोल्‍ट्री फार्म भाड्याने घेऊन तेथे २२ कुटुंबांची सोय केली. आंदोलने, उपोषणे करूनही ठेकेदाराच्‍या विरोधात कारवाई करण्‍यात आली नाही. त्‍यामुळे ‘माळीणच्‍या गावकर्‍यांसमवेत आम्‍हीही मेलो असतो, तर बरे झाले असते’, अशी प्रतिक्रिया तेथील नागरिकांनी व्‍यक्‍त केली आहे.

संपादकीय भूमिका

  • आपद्‍ग्रस्‍तांचा निधी हडप करणार्‍या ठेकेदाराकडून हे पैसे वसूल करून घ्‍यायला हवेत !
  • प्रशासन आणि सरकार यांनी याकडे लक्ष देऊन नागरिकांच्‍या निवार्‍याची सोय करावी !